सायबर गुन्हेगारीबाबत गौतम पब्लिक स्कूल मध्ये डीवायएसपी सोहेल शेख यांचे प्रबोधन
सायबर गुन्हेगारीबाबत गौतम पब्लिक स्कूल मध्ये डीवायएसपी सोहेल शेख यांचे प्रबोधन
सायबर गुन्हेगारीबाबत गौतम पब्लिक स्कूल मध्ये डीवायएसपी सोहेल शेख यांचे प्रबोधन
कोपरगाव विजय कापसे दि १२ ऑगस्ट २०२४ :- कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील गौतम पब्लिक स्कूल प्राचार्य नूर शेख यांचे सुपुत्र उदगीर लातूरचे डीवायएसपी सोहेल शेख यांचे नुकतेच गौतम पब्लिक स्कूलमध्ये ‘सायबर गुन्हे’ या विषयावर प्रबोधनपर व्याख्यान संपन्न झाले. यामध्ये विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे, गंभीरता, सतर्कता व त्यासंबंधी असलेले महत्वपूर्ण कायदे याबद्दल सखोल माहिती डीवायएसपी सोहेल शेख यांनी गौतमच्या विद्यार्थ्यांना दिली.
शेख यांनी सांगितले की, एकविसावे शतक हे माहिती व तंत्रज्ञानाचे असून यामध्ये मोठ्या प्रमाणात सायबर गुन्ह्याची वाढ होताना दिसून येत आहे. आजकाल यामध्ये अनेक गुन्हेगारी वृत्तीचे लोक सक्रिय असून त्यांच्या मार्फत सर्रास लोकांना फसवले जात आहे. मोबाईल वर अनेक प्रकारचे प्रलोभनात्मक खोटे संदेश येतात आणि साक्षर लोक सुद्धा यास बळी पडत आहेत.
कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपली वैयक्तिक माहिती देऊ नये तसेच ओटीपी, एटीएम पिन सांगू नये. सोशल मीडियाचा वापर अतिशय काळजीपूर्वक करून विनाकारण एखादा विडिओ लाईक करणे, कमेंट करणे किंवा शेयर करणे टाळावे. जातीवाचक धर्मांबद्दल टीका टिप्पणी करू नये. अन्यथा शिक्षेस पात्र व्हाल असा सावधानतेचा इशाराही त्यांनी दिला. सायबर गुन्ह्यापासून स्वतःला वाचवावे तसेच सावधान व सतर्क राहण्याचे आवाहन यावेळी शेख यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना केले. तसेच समस्या निर्माण झाल्यास ११२ वर संपर्क साधावा असे सांगितले.
यावेळी डीवायएसपी सोहेल शेख यांचा सत्कार शाळेचे प्राचार्य नूर शेख यांच्या उपस्थितीत पर्यवेक्षिका ज्योती शेलार व प्राथमिक विभाग प्रमुख राजेंद्र आढाव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सर्व शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरक्षनाथ चव्हाण यांनी केले ते आभार रमेश पटारे यांनी मानले.