कर्मवीर शंकरराव काळे कारखाना मिल रोलर पूजन उत्साहात संपन्न
कर्मवीर शंकरराव काळे कारखाना मिल रोलर पूजन उत्साहात संपन्न
कर्मवीर शंकरराव काळे कारखाना मिल रोलर पूजन उत्साहात संपन्न
कोपरगाव विजय कापसे दि १३ ऑगस्ट २०२४ :- कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या २०२४-२५ च्या ७० व्या गळीत हंगामाची तयारी करण्याच्या दृष्टीने मिल रोलर पूजन कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मनोज जगझाप यांच्या हस्ते मंगळवार (दि.१३) रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
मिल रोलर पूजनाने कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाची तयारी सुरु झालेली आहे. कारखाना कार्यक्षेत्रात अजूनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही परंतु पुढील काही दिवसात समाधानकारक पाऊस होईल अशी अपेक्षा आहे. कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून मागील वर्षीपासून संपूर्ण नवीन युनिटवर गळीत हंगाम यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. त्यामुळे येणाऱ्या गळीत हंगामाची पूर्व तयारी म्हणून दरवर्षी करण्यात येणारे मिल रोलर पूजन मंगळवार (दि.१३) रोजी संपन्न झाले.कारखान्याच्या यंत्र सामुग्रीचे देखभाल दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच गळीत हंगामाच्या दृष्टीने ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा भरती अॅडव्हान्स वाटप सुरु करण्यात आले आहे.
याप्रसंगी कारखान्याचे व्हा.चेअरमन डॉ. मच्छिंद्र बर्डे, संचालक दिलीपराव बोरनारे, सूर्यभान कोळपे, सुधाकर रोहोम, राजेंद्र घुमरे, सचिन चांदगुडे, श्रीराम राजेभोसले, राहुल रोहमारे, प्रवीण शिंदे, शंकरराव चव्हाण, अनिल कदम, अशोक मवाळ, सुनील मांजरे, वसंतराव आभाळे, दिनार कुदळे, श्रावण आसने, गंगाधर औताडे, संचालिका वत्सलाबाई जाधव, इंदुबाई शिंदे, प्र.कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद, असि. सेक्रेटरी संतोष शिरसाठ, चीफ इंजिनिअर निवृत्ती गांगुर्डे, चीफ केमिस्ट सुर्यकांत ताकवणे, फायनान्स मॅनेजर सोमनाथ बोरनारे विविध खात्यांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.