कर्मवीर काळे कारखान्याच्या उपाध्यक्षपदी शंकरराव चव्हाण
कर्मवीर काळे कारखान्याच्या उपाध्यक्षपदी शंकरराव चव्हाण
कर्मवीर काळे कारखान्याच्या उपाध्यक्षपदी शंकरराव चव्हाण
कोपरगाव विजय कापसे दि १३ ऑगस्ट २०२४ – सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या व कोपरगाव तालुका तसेच पंचक्रोशीतील शेतकरी, छोटेमोठे व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांच्या अर्थकारणाला चालना देणाऱ्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी कारखान्याचे संचालक शंकरराव गहीनाजी चव्हाण यांची संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल कारखान्याचे जेष्ठ संचालक व मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे व कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष डॉ.मच्छिंद्र बर्डे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपाध्यक्षपदी शंकरराव चव्हाण यांची संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली. यावेळी आपल्या निवडीबद्दल बोलतांना नवनिर्वाचित उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण म्हणाले की, कर्मवीर शंकररावजी काळे साहेब व माजी आमदार अशोकराव काळे यांनी नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी दिली आहे. ही परंपरा कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांच्या माध्यमातून पुढे सुरु आहे. कारखान्याचे आधारस्तंभ माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याला आ. आशुतोष काळे यांनी नेहमीच प्रगतीपथावर ठेवले आहे. कारखान्याच्या प्रगतीसाठी मला देखील उपाध्यक्षपदी संधी दिली त्याबद्दल नवनिर्वाचित उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण यांनी माजी आमदार अशोकराव काळे, आ.आशुतोष काळे व सर्व संचालक मंडळाचे आभार मानले.
यावेळी बोलतांना मावळते उपाध्यक्ष डॉ. मच्छिंद्र बर्डे म्हणाले की, कर्मवीर शंकररावजी काळे साहेब, माजी आमदार अशोकराव काळे व आ.आशुतोष काळे यांच्या कार्यपद्धतीतून कारखान्याच्या प्रगतीचा आलेख उंचावण्यात उपाध्यक्षपदाच्या माध्यमातून सहभाग घेता आला याचा आनंद आहे. आ. आशुतोष काळे यांनी केलेले सहकार्य त्यामुळे मिळालेली जबबादारी निश्चितपणे चांगल्या पद्धतीने पार पाडता आली याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, प्र.कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे, सेक्रेटरी बाबा सय्यद, डेप्युटी सेक्रेटरी संतोष शिरसाठ व पदाधिकारी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती शुभांगी गोंड प्रादेशिक उपसंचालक (साखर) अहमदनगर यांनी काम पाहिले.