पशुधन महाविद्यालयात आमदार आशुतोष काळेच्या हस्ते ध्वजारोहण
पशुधन महाविद्यालयात आमदार आशुतोष काळेच्या हस्ते ध्वजारोहण
७८ वा स्वतंत्र दिन जल्लोषात साजरा
कोपरगाव विजय कापसे दि १६ ऑगस्ट २०२४– संबंध देशभर स्वातंत्र्याचा ७८ वा अमृत महोत्सव सोहळा मोठ्या जल्लोषात विविध उपक्रमांनी साजरा होत असून त्याच अनुषंगाने कोपरगाव येथील पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका महाविद्यालयात गुरुवार दि १५ ऑगस्ट स्वतंत्र दिनी कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका महाविद्यालयाचे डॉ अनिरुद्ध काळे, प्राचार्य ज्ञानेश्वर मगर, पूजा खामकर, अंजली काळे, श्वेता सावतडकर, स्वाती राजपूत आदी सह बाळासाहेब आढाव, मंदार पहाडे, स्वप्नील निखाडे, महेश गोसावी, संदीप सावतडकर ,रुपेश वाघचौरे ,राहुल हंसवाल, प्रताप जोशी, कुष्णा आढाव, आनंत डीके, विनोद थोरात, शशिकांत शेळके, गणेश गोसावी, राजेद्र सावतडकर, विरेन बोरावके, अमोल गिरमे, राजेद्र खैरनार, राजेद्र वाघचौरे,प्रदीप कुऱ्हाडे, प्रकाश दुशिंग, मयुर राऊत, आकाश गायकवाड, फकीर कुरेशी, अशोक आव्हाटे, दीपक गंगवाल आदी ग्रामस्थ पालक व विद्यार्थी उपस्थित होते. या प्रसंगी आमदार आशुतोष काळे यांनी सर्वांना १५ ऑगस्ट स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.