आपला जिल्हा

उद्या महाविकास आघाडीच्या वतीने कोपरगाव बंदची हाक

उद्या महाविकास आघाडीच्या वतीने कोपरगाव बंदची हाक
उद्या महाविकास आघाडीच्या वतीने कोपरगाव बंदची हाक
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २३ ऑगस्ट २०२४माणुसकीला काळीमा फासणारी घटना नुकतीच बदलापूर येथे उघडघीस आली असून याचे पडसात संपूर्ण देशभरात उसळत असून  या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने उद्या शनिवारी दि २४ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक दिली असून याच पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुक्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी २२ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेत उद्या शनिवारी कोपरगाव तालुका बंदची दिली आहे.

जाहिरात

महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत कोपरगाव शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते तथा जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, काँग्रेसचे नितीन शिंदे, शिवसेनेचे कैलास जाधव, कोपरगाव शहर शिवसेनाप्रमुख सनी वाघ, माजी शहरप्रमुख कलविंदर डडियाल, माजी तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे,माजी जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, माजी शहरप्रमुख भरत मोरे, माजी नगरसेवक अनिल आव्हाड, पप्पू पडियार,रंजन जाधव, रवींद्र कथले, काँग्रेसचे तुषार पोटे,स्वप्निल पवार, राखी विसपुते, सौ शिंगाडे आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

महाविकास आघाडीच्या वतीने कोपरगाव  येथे पत्रकार परिषद संपन्न झाली असता यात बदलापूर येथे अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी महाविकास आघाडीने महाराष्ट बंद ची हाक दिलेली असून येत्या २४ तारखेला महाराष्ट बंद चे आवाहन केलेले आहे,सदर बंद मध्ये कोपरगाव शहरातील व तालुक्यातील व्यापारी,समाजिक संघटना आणी समस्त जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन कोपरगाव तालुका महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले असून,बदलापूर बरोबर च महाराष्ट्रात इतर ही ठिकाणी लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत असून राज्य सरकार मूकपणे हे सर्व पाहत आहे.निवडणुकीसाठी लाडक्या बहीण योजनेचा प्रचार करत मुख्यामंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री जनतेच्या पैशातून फिरत आहे.मात्र संवेदनशील घटनेवर अकरा अकरा तास गुन्हा दाखल करण्यास लागतात यामध्ये  सरकार ची भूमिका लक्षात येते.या सर्व गोष्टींचा कोपरगाव तालुक्यातील महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तीव्र शब्दात निषेध करत  मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री यांच्या राजीनाम्या ची मागणी करत उद्याचा बंद शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे