आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा- चैतालीताई काळे
आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा- चैतालीताई काळे
आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा- चैतालीताई काळे
कोपरगाव विजय कापसे दि २३ ऑगस्ट २०२४ :- आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले विविध कौशल्य मांडण्यासाठी मुक्त व्यासपीठ उपलब्ध झाले असून विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन चैतालीताई काळे यांनी केले.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात, राज्यातील एक हजार महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. हे कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यासाठी कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे सौ. सुशिलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पात्र ठरले आहे. महाविद्यालयाला चिलिंग प्लॅन्ट टेक्निशियन, होम अप्लायन्सेस टेक्निशियन व अकाउंट असिस्टंट ह्या कोर्सेसला मान्यता देण्यात आली आहे. संस्थेच्या सचिव व जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे यांच्या हस्ते या प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियाना अंतर्गत आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा माजी आमदार अशोकराव काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी त्या बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या की, आजचे युग हे स्पर्धेचे युग असून स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पारंपारिक शिक्षणाबरोबरच जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी व शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो विद्यार्थी स्वताच्या पायावर खंबीरपणे उभा राहून जीवनात यशस्वी होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे पारंपारिक शिक्षणाबरोबरच प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अंगी विविध कला कौशल्य वाढीसाठी महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वत:च्या अंगी असलेल्या कौशल्याचा विकास होवून त्या विद्यार्थ्याला रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. यामध्ये कौशल्य विकास केंद्र महत्वाची भूमिका बजावतील व स्पर्धेच्या युगात महाविद्यालयीन युवक युवती निश्चितपणे सक्षम होतील असा विश्वास सौ.चैतालीताई काळे यांनी यावेळी व्यक्त केला.
ह्या अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांनी सौ.चैतालीताई काळे यांच्या समवेत देर्डे चांदवड येथील चिलिंग प्लॅन्टच्या कार्यपद्धतीबद्दल सखोल माहिती जाणून घेतली. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सौ. विजया गुरसळ, प्राध्यापक, विद्यार्थी व देर्डे चांदवडचे ग्रामस्थ उपस्थित होते.