मा.आ.अशोकराव काळेंच्या वाढदिवसनिमित्त सौ.सुशीलामाई काळे महाविद्यालय व गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटचे वतीने रक्तदान शिबीर संपन्न
मा.आ.अशोकराव काळेंच्या वाढदिवसनिमित्त सौ.सुशीलामाई काळे महाविद्यालय व गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटचे वतीने रक्तदान शिबीर संपन्न
मा.आ.अशोकराव काळेंच्या वाढदिवसनिमित्त सौ.सुशीलामाई काळे महाविद्यालय व गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटचे वतीने रक्तदान शिबीर संपन्न
कोपरगाव विजय कापसे दि २३ ऑगस्ट २०२४ :- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.आ.आशोकराव काळे यांचा ७१ वा वाढदिवस सौ.सुशीलामाई काळे महाविद्यालय व गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटचे वतीने भव्य रक्तदान शिबिर, वृक्षारोपण तसेच विविध समाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ. सुशिलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना व गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी संजीवनी रक्तपेढी कोपरगाव यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन संस्थेच्या सचिव जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सौ.चैतालीताई काळे म्हणाल्या की, रक्तदान करणे हे आपले कर्तव्य आणि त्याचबरोबर आपली सामाजिक बांधिलकी देखील आहे.आपण केलेल्या रक्तदानातून एखाद्या रुग्णाचा जीव वाचविणे यासारखे दुसरे पुण्य नाही.अचानक होणाऱ्या अपघातामध्ये गंभीर जखमी रुग्णांवर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागते त्यावेळी रक्ताची खूप गरज भासते त्यासाठी रक्तपेढी शिवाय पर्याय नसतो. मात्र काही दिवसांपासून बहुतांश रक्तपेढीकडे आवश्यक असणारा रक्त साठा शिल्लक राहत नसल्यामुळे त्यांच्या चिंता वाढल्या आहेत. त्यामुळे यापुढील काळात रक्तदान चळवळीची व्याप्ती वाढणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सौ. सुशिलामाई काळे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सौ. विजया गुरसळ, गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटचे प्राचार्य सुभाष भारती, गौतम पब्लिक स्कुलचे प्राचार्य नुर शेख आदींसह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.