कोल्हे गट

संजीवनी युवा प्रतिष्ठानची २०२४ दहीहंडी उत्सवाची जम्बो कार्यकारिणी जाहीर

संजीवनी युवा प्रतिष्ठानची २०२४ दहीहंडी उत्सवाची जम्बो कार्यकारिणी जाहीर
संजीवनी युवा प्रतिष्ठानची २०२४ दहीहंडी उत्सवाची जम्बो कार्यकारिणी जाहीर
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २३ ऑगस्ट २०२४सामाजिक उपक्रम घेण्यात आघाडीवर असणारे संजीवनी युवा प्रतिष्ठान सातत्याने उपक्रमशील असते.यंदाची २०२४ छत्रपती शिवाजी महाराज मानाची दहीहंडी उत्सव समिती जाहीर झाली असून सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी अभिनंदन करून उत्सवाच्या नियोजनाच्या दृष्टीने शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात

यावेळी साजरा केला जाणारा दहीहंडी उत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून सिद्धांत सोनवणे, कार्याध्यक्ष रवींद्र लचुरे, उपाध्यक्ष स्वराज सुर्यवंशी, मोनु म्हस्के, संघटक अनिल पगारे, गणेश शेजवळ, अजय शार्दुल, संजय खरोटे, सचिव भैय्या नागरे, अमोल बागुल, खजिनदार समाधान कुऱ्हे, अनिल गायकवाड, स्टेज कमिटी गणेश शिंदे, सुजल चंदनशिव, दुर्गेश गवळी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने युवा सेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

कोपरगावमद्ये नेहमी आगळे वेगळे उपक्रम घेऊन नागरिकांचे कौतुकास पात्र होण्याचा बहुमान संजीवनीचे युवासेवक ठरतात.सामाजिक उत्तरदायित्व सांभाळून लोकोपयोगी कामाचा धडाका प्रतिष्ठान नेहमी राबवत असते. जागवूया ज्योत माणुसकीची हे ब्रीद वाक्य घेऊन विवेकभैय्या कोल्हे यांचे सर्वच सहकारी संस्कृती जतन करण्यात मोलाचा वाटा उचलतात.त्याच प्रमाणे यावेळी देखील दहीहंडी उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा केला जाईल असा विश्वास सर्वच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

जाहिरात मुक्त
गोविंदा रे गोपाळा या जयघोषाने कोपरगाव दुमदुमून जाणार आहे. युवकांना भगवान श्रीकृष्णांच्या या सोहळ्याची उत्सुकता लागली असून नव्याने जाहीर झालेली समिती जोमाने काम करेल.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे