गोदावरी दूध संघ

संवत्सरच्या अखंड हरिनाम सप्ताहास जल्लोषात सुरुवात

संवत्सरच्या अखंड हरिनाम सप्ताहास जल्लोषात सुरुवात

संवत्सरच्या अखंड हरिनाम सप्ताहास जल्लोषात सुरुवात

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २३ ऑगस्ट २०२४कोपरगाव तालुक्यातील पौराणिक संवत्सर गावात सालाबादप्रमाणे  अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात आज शुक्रवार दिनांक २३ ऑगस्ट २०२४ म्हणजेच पंचमीच्या दिवशी प्रसिद्ध  ह.भ.प भानुदास महाराज बोलकीकर यांचे कीर्तनाने मोठया जल्लोषात झाली.

जाहिरात

संवत्सर गावात आज पासून सुरू झालेल्या या वार्षिक सप्ताहाची समाप्ती शुक्रवार  दिनांक ३० ऑगस्ट २०२४ रोजी संवत्सर येथील शनी मंदिर या ठिकाणी आमटी भाकरीचा महाप्रसाद वाटप करत होणार आहे. तरी जास्तीत जास्त भाविकांनी दररोज सप्ताह स्थळी हरिपाठासाठी व समाप्तीच्या दिवशी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सप्ताह आयोजक तसेच ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले.

जाहिरात

या प्रसंगी गावचे मार्गदर्शक तथा नामदेवरावजी परजणे पाटील दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे,संवत्सरचे उपसरपंच विवेक  परजणे, चंद्रकांत लोखंडे, लक्ष्मणराव सगळे, दिलीपराव ढेपले, सोमनाथ  निरगुडे,  लक्ष्मणराव परजणे, छायाचित्रकार पोपट करपे, पंचायत समितीचे अधिकारी पंडित वाघिरे वाघिरे, सहायक गटविकास अधिकारी बाळासाहेब साबळे, श्री लाठे साहेब, शिवाजीराव गायकवाड, अनिल आचारी, अविनाश गायकवाड, बाळासाहेब दहे, खंडू  फेपाळे आदी सह  पंचक्रोशीतील भजनी मंडळ मोठया संख्येने उपस्थित होते या सप्ताहाचे प्रास्ताविक लक्ष्मणराव साबळे यांनी  केले.

जाहिरात

संवत्सर परिसराचे भाग्यविधाते वैकुंठवासी नामदेवआण्णा परजणे पाटील यांनी सुरू केलेली गावच्या सप्ताहाची परंपरा माजी जिल्हा परिषद सदस्य तथा नामदेवराव परजणे पाटील तालुका दूध उत्पादक संघाचे चेअरमन राजेश परजणे यांनी देखील कायम सुरू ठेवत गावच्या प्रत्येक धार्मिक कार्यात सहभाग नोंदवला आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे