कारखाना कार्यस्थळावर इंदिरा महोत्सवाची जय्यत तयारी सुरू ३ व ४ सप्टेंबर रोजी महिला बचत गटांचा भव्य मेळावा
कारखाना कार्यस्थळावर इंदिरा महोत्सवाची जय्यत तयारी सुरू ३ व ४ सप्टेंबर रोजी महिला बचत गटांचा भव्य मेळावा
संगमनेर प्रतिनिधी दि ३० ऑगस्ट २०२४– काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील महिलांना रोजगार व स्वयंरोजगाराची संधी त्याचप्रमाणे बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालांना विक्रीसाठी बाजारपेठ मिळावी याकरता डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून तीन व चार सप्टेंबर रोजी भव्य इंदिरा महोत्सव होणार असून या महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे.
यामध्ये 51 स्टॉल्स उभारण्यात आले असून या स्टॉल्स मधून लिज्जत पापड,सह्याद्री ऍग्रो, कापसे पैठणी, प्रतीक्षा ट्रॅडिशनल बॅग, विजया ऍग्रो, टू ब्रदर्स, गोदावरी फार्म ,महात्मा फुले कृषी विद्यापीठ, बारामती बायोगॅस, सेजल ग्रुप, सेल्को फाउंडेशन आदींसह नामांकित कंपन्यांचा सहभाग आहे. या कंपन्या महिलांना गृह उद्योगासाठी कच्चामाल देऊन त्यांच्याकडून पक्का माल तयार करून घेऊन बाजारपेठेत देणार आहेत. यामुळे महिलांना घरबसल्या स्वयंरोजगार मिळणार आहे तसेच स्वयंरोजगारासाठी विविध बँका कर्ज उपलब्धता व प्रकरण यासाठी मार्गदर्शन करणार असून बँकांची प्रतिनिधी हजर असणार आहे यावेळी रोजगार, बचत गटाची उत्पादने, पॅकेजिंग, मार्केटिंग याबाबत चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
याच वेळी उपस्थित सर्व महिलांचे आरोग्य तपासणी होणार असून या सर्व महिलांना कापसे पैठणी कडून भाग्यवंत महिला म्हणून 500 महिलांना पैठणी ही दिली जाणार आहे. अमृतेश्वर मंदिरासमोरील प्रांगणात जर्मन हंगर पद्धतीचा वीस हजार स्क्वेअर फुटाचा भव्य मंडप, त्याचबरोबर 51 स्टॉल्स, एलईडी व्यवस्था, साऊंड सिस्टिम, बैठक व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, पत्रकार कक्ष, भव्य व्यासपीठ, बचत गटात काम केलेल्या राज्यभरातील नामांकित व्यक्तींचे चर्चासत्र, अशी दोन दिवस महिलांसाठी पर्वणी ठरणार आहे. तरी या दोन दिवसीय इंदिरा महोत्सवात तालुक्यातील बचत गटातील सर्व महिला भगिनी व इतर सर्व महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात व मा. नगराध्यक्षा सौ.दुर्गाताई तांबे यांनी केले आहे.