आपला जिल्हा

एक हसतमुख व्यक्तिमत्व स्टेनोग्रापर विजयकुमार नेटकेचे सिनेसृष्टीत पदार्पण

एक हसतमुख व्यक्तिमत्व स्टेनोग्रापर विजयकुमार नेटकेचे सिनेसृष्टीत पदार्पण

एक हसतमुख व्यक्तिमत्व स्टेनोग्रापर विजयकुमार नेटकेचे सिनेसृष्टीत पदार्पण

अहमदनगर विजय कापसे दि ४ सप्टेंबर २०२४अहमदनगर जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालयात स्टेनोग्राफर म्हणुन काम करत असलेले विजयकुमार नेटके एक हसतमुख व्यक्तिमत्व म्हणून सर्वाना परिचित असून त्यांनी झिंजाय या मराठी चित्रपटात काम करून सिनेसृष्टीत एक पाऊल टाकले असल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

स्टेनोग्रापर विजयकुमार नेटकेची ओळख म्हणजे त्यांचे कामाप्रती असलेले प्रेम आणि कामात स्वतःला वाहुन घेतल्याने ते सतत कामात व्यस्त असतात, त्यांच्या कार्यालयात गेलं तरी, त्यांना बहुदा बोलायलाही वेळ नसतो परंतु मी माझा कामानिमित्त त्यांना काही दिवसांपुर्वी सहजच संध्याकाळी भेटलो असता त्यांचा सोबत मनसोक्त आयुष्यावर बोलु काही म्हणुन गप्पा झाल्या. त्यांच सातवीपर्यंतचं प्राथमिक शिक्षण खेडयात झालं, त्यामुळे शहरापेक्षा खेड्याकडे त्यांचा जवळून सबंध आल्याने त्यांचा खेड्याकडे जास्त ओढा आहे. अहमदनगर येथे राहत असलेले त्यांचे मोठे बंधु सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक यांच्याकडे राहुन भिंगार नाईट स्कुल मध्ये माध्यमिक शिक्षण तर प्रेमराज सारडा कॉलेजमध्ये त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पुढे मात्र पुणे विद्यापिठात पदव्युत्तर शिक्षणासाठी ते गेले. वाढत्या वयात अभ्यास, वर्तमानपत्र वाचनाचं वेड, खो-खो, ज्युदो- कराटे सारख्या इव्हेंटमध्ये सहभागी होऊन अनेक स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून त्यांनी आपला मानस व ध्यास पुर्ण केला. दहावी पास झाल्यानंतर “स्टेनोग्राफी करशील का?” या एका प्रश्नावर काहीही माहिती नसतांना मोठ्या भावाला होकार देऊन शब्द दिला. आणि अपार कष्ठ घेवून स्टेनोग्राफिला जिल्हयात प्रथम येऊन त्या काळी पेपरात झळकणारा हा खानदानितला पहिलाच हिरा असावा. मित्रांबरोबर खेळण्या बागडण्यात मोजक्याच चार मित्रांच्या सोबतीने त्यांनी गृपने अभ्यास करुन एकमेकांपासून शिकणे हा यांचा नित्त्याचा उद्योग ठरला. आत्मविश्वास आणि अवचेतन जागृत करता येत असल्याने हवी ती सकारात्मक गोष्ट कशी साध्य करता येईल याच्यात त्यांचा हातखंडा असल्याने, कोणताही विषय ते धिरगंभीरतेणे समजून घेवून त्यावर सहज मार्ग काढतात. आज देखील विषय कोणताही असो, तो बारकाईन समजून घेवून त्यावर सुवर्णमध्य काढणे ही त्यांच्या बाबतीतील वाखन्याजोगी गोष्ट आहे.

जाहिरात

पदवीचा अभ्यास करता-करताच कोणाचेही मार्गदर्शन नसतांना चार मित्रांच्या सोबतीने एमपीएससीचा अभ्यास केला, आणि वयाच्या पंचविसीतच पहिल्याच प्रयत्नात एमपीएससी परिक्षा उत्तीर्ण होऊन आयुष्याला वेगळे वळण देण्यात ते यशस्वी झाले. मुंबई, अहमदनगर, नाशिक, जळगांव अशा ठिकाणी त्यांनी शासकीय सेवेत अतिउत्कृष्ट योगदान दिलेले आहे. मे १९९७ मध्ये दिपविजयाचा दिवा पेटला आणि थाटामाटात लग्न झालं. थाटात मांडलेल्या संसारात दोन आपत्ये झाली. नगर व नाशिक अशा ठिकाणी लेकरांना उच्च शिक्षण देऊन आयुष्यातील निम्मा टप्पा त्यांनी गाठला. त्यांना दोन वेळा झालेल्या अपघातात, मरता मरता सावरायला पत्नीचा सिंहाचा वाटा आहे.

जाहिरात मुक्त

त्यांना दरवर्षीच लेकरांचे व स्वतःचे घरगुती वाढदिवस साजरे करण्याची पहिल्यापासूनच हौस आहे. सन २०२२ मध्ये त्यांचा लग्नाचा पंचविसावा वाढदिवस आप्तेष्ट व मित्रमंडळी या सर्वांसमक्ष मोठया थाटामाटात साजरा करुन मनातील एक हौस म्हणता येईल ती त्यांनी पुर्ण केली. त्यांना लिखानाचाही छंद आहे, त्यांची दोन पुस्तके लिहुन तयार आहेत, लवकरच त्याचे प्रकाशन करण्याच्या मार्गावर ते आहेत. रंगमंचावर हौशी कलाकार म्हणून काम करण्याची त्यांची एक हौस होती, विनामुल्य छंद जोपासण्याची परवानगी घेवून त्यांना “झिंजाय” नावाच्या मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली, त्यात त्यांनी महत्वपूर्ण भुकिमा साकारलेली आहे, यात त्यांना चित्रपट दिग्दर्शक तथा प्रसिध्द नाटककार दिपक घारु तसेच निर्माते यज्ञ घारु यांची मोलाची साथ मिळाली, आणि मराठी चित्रपट क्षेत्रातील दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळुन “झिंजाय” चित्रपटाची आता आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवासाठी निवड झालेली असून, त्यांना त्यांच्या अगामी चित्रपटासाठी व त्यांच्या सर्व टिमसाठी आमच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.

नेटके यांनी साकारलेली भूमिका

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे