आशुतोषने कोपरगावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविल्याचा अभिमान व समाधान-मा.आ.अशोकराव काळे
आशुतोषने कोपरगावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविल्याचा अभिमान व समाधान-मा.आ.अशोकराव काळे
आशुतोषने कोपरगावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविल्याचा अभिमान व समाधान-मा.आ.अशोकराव काळे
कोपरगाव विजय कापसे दि १४ सप्टेंबर २०२४ :- कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न किती गंभीर होता याची दाहकता मी अनुभवली आहे आणि याच पाणी प्रश्नाचा संघर्ष माझ्या कार्यकाळात मी देखील केला आहे.त्यावेळी प्रामाणिक प्रयत्न माझे देखील होते परंतु त्यावेळी सत्ताधारी पक्षाचा आमदार नसल्यामुळे अपेक्षित यश आले नाही. मात्र ज्या प्रश्नाला मी हात घातला तोच प्रश्न आशुतोषने ५ नं.साठवण तलावाच्या माध्यमातून सोडविला याचा अभिमान असून कोपरगावकरांची तहान भागणार याचे मोठे समाधान वाटत असल्याचे मा.आ.अशोकराव काळे यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की, माझ्या कार्यकाळात ४ नंबर साठवण तलावाचा गाळ काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून दोन कोटीचा निधी मंजूर करून कोपरगाव नगरपरिषदेला दिला होता. परंतु कोपरगाव नगरपरिषदेकडून तो निधी वापरला गेला नाही त्यामुळे त्यावेळी ४ नंबर साठवण तलावाचे काम होवू शकले नाही. कदाचित ते काम झाले असते तर परिस्थिती थोडीशी बरी असती. कोपरगाव शहराच्या नागरिकांची तहान भागावी हि माझी देखील प्रमाणिक इच्छा होती.
त्याप्रमाणे आशुतोषने देखील सातत्याने हा पाणी प्रश्न उचलून धरला. धरणे आंदोलन व वेळप्रसंगी आमरण उपोषण देखील केले.त्यावेळी आपला मुलगा उपाशी असतांना ते तीन दिवस एका पित्याची काय अवस्था होते हि परिस्थिती मी अनुभवली असून माझ्या आयुष्यातील ते दिवस मी कधीही विसरू शकणार नाही. मात्र त्यावेळी आशुतोष हे सर्व कोपरगावकरांसाठी करीत आहे याचा मला अभिमान देखील वाटत होता. त्याचे हे प्रयत्न फळाला येवून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सुटत आहे याचे देखील मनाला अलौकिक समाधान आहे. त्यासाठी त्याने केलेले प्रयत्न, पाठपुरावा हा कोपरगावकरांना ठावूक आहे. कोपरगावची जनता देखील त्याच्या सोबत होती. २०१९ च्या निवडणुकीत कोपरगावकरांनी साथ दिली त्यामुळे कोपरगावकरांच्या आशीर्वादाने हा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आशुतोष सोडवू शकला याचा मला अभिमान आहे. ज्याप्रमाणे त्याने अशक्यप्राय असलेला कोपरगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवून दाखविला ते पाहता यापुढील काळातही त्याला अशीच साथ द्या कोपरगावचा एकही प्रश्न आशुतोष शिल्लक ठेवणार नाही याची मी ग्वाही देतो असे मा.आ. अशोकराव काळे यांनी शेवटी म्हटले आहे.