विखे-पाटील

बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या वर्पे कुटूबियांना  ना. विखे पाटील यांनी भेट घेत दिला शासनाचा  मदतीचा धनादेश

बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या वर्पे कुटूबियांना  ना. विखे पाटील यांनी भेट घेत दिला शासनाचा  मदतीचा धनादेश

बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या वर्पे कुटूबियांना  ना. विखे पाटील यांनी भेट घेत दिला शासनाचा  मदतीचा धनादेश

जाहिरात

संगमनेर प्रतिनिधी दि.१४ सप्टेंबर २०२४निमगाव टेंभी येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या श्रीमती संगिता वर्पे यांच्या कुटूबियांची महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेवून सांत्वन केले.शासन मदतीचा सुमारे २५लाख रुपयांच्या मदतीचे पत्र सुपूर्त केले.

जाहिरात

मंत्री विखे पाटील यांनी घटनास्थळाची पाहाणी करून या परीसरात बिबट्यांचा असलेला वावर आणि याबबात कठोर उपाय योजना करण्याबाबतच्या सूचना मंत्री विखे यांनी दिल्या .या परीसरात मोठ्या प्रमाणात शेतीक्षेत्र आहे.शिरापूर घाटात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात संचार असल्याच्या तक्रारी ग्रमास्थांनी केल्या.याबाबत गांभीर्यपुर्वक दखल घेवून वन विभागाने द्रोण तंत्रज्ञानाचा उपयोग करून बिबट्यांचा शोध घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

जाहिरात

सध्या सर्वच भागात बिबट्यांचा संचार वाढत आहे.शालेय विद्यार्थ्यामध्ये सुध्दा भीतीचे वातावरण असल्याचे स्पष्ट करून वनविभागाने जादा यंत्रणेचा वापर करण्याचे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी दिले.

जाहिरात मुक्त

या भागात रस्तांच्या असलेल्या अडचणीबाबतही ग्रामस्थांनी मंत्री विखे पाटील यांच्याकडे तक्रारी केल्या याबबात तातडीने प्रस्ताव तयार करा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही ना.विखे पाटील यांनी दिली.जिल्ह्याचे वन अधिकारी धर्मवीर सालविठ्ठल उपविभागीय अधिकारी संदीप पाटील तहसिलदार धीरज मांजरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे