ढोल ताशा स्पर्धेत विवेकभैय्या कोल्हे यांनी स्वतः वाजवले आणि मैदान गाजवलेही
वाजवेल तो गाजवेल ढोल ताशा स्पर्धा
कोपरगाव विजय कापसे दि १५ सप्टेंबर २०२४– गणेशोत्सवानिमित्त संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित वाजवेल तो गाजवेल ढोल ताशा स्पर्धा शनिवारी कोपरगाव येथे आयोजित करण्यात आली होती.यावेळी विविध ढोल ताशा वादक मंडळांनी आपला सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेसाठी भरीव बक्षिसे ठेवण्यात आली असल्याने एकच चुरस बघायला मिळाली.
सांस्कृतिक वारसा जतन करणारे संजीवनी युवा प्रतिष्ठान हे सतत कौतुकास्पद उपक्रम घेत असते.युवकांना हक्काचे आणि निःपक्षपाती व्यासपीठ उभे करून देत कलागुणांना वाव देण्याचे काम केले जाते.सध्या मोबाईलच्या आणि धकाधकीच्या जीवनातून आपण वेळ काढून सांस्कृतिक वारसा जतन करण्याची वेळ आली आहे.आपल्या संस्कृतीचे वाद्य आणि कला जपली गेली पाहिजे यासाठी पुढील वर्षी अधिक भव्य स्वरूपात या स्पर्धेचे आयोजन करणार आहोत.महिला भगिनींना सहभाग अतिशय मोठ्या प्रमाणात यासाठी आहे हे अभिमानास्पद आहे.
वादक मोठा झाला की पथक आपोआप मोठे होईल हा विचार घेऊन आपण पुढे गेलो तर येणाऱ्या काळात नक्कीच खूप यश मिळेल.सामूहिक शक्ती तेव्हा वाढते जेव्हा आपण उणीवा दूर करून सकारात्मक दृष्टीने मार्ग काढतो तेव्हा यशस्वी होण्यासाठी संधी आपोआप चालून येतात.कोपरगावकर हे संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या सर्वच उपक्रमांना भरभरून साथ देतात असेच आशीर्वाद पाठीशी ठेवावे व गणरायाने सर्वांना सुखी आणि आनंदी ठेवावे अशी प्रार्थना केली.स्पर्धेत कोण हरले कोण जिंकले या पेक्षा भारतीय संस्कृती जिंकली असे कोल्हे यावेळी म्हणाले.
अतीशय पारदर्शक स्पर्धा आयोजित केल्याने कोल्हे यांचे सर्वच मंडळांनी कौतुक केले आहे.संगमनेर येतील तांडव ढोल पथकाने अतिशय सुरेख वादन करून सर्वांची मने जिंकली होती.या स्पर्धेत हिंदुवाडा तरुण मंडळ प्रथम क्रमांक,मुंबादेवी मंडळ द्वितीय,हत्ती गणपती मंडळ तृतीय,जय तुळजा भवानी मंडळ चतुर्थ असे पारितोषिके देण्यात आली.त्याच प्रमाणे विजेता तरुण मंडळ,सनी ग्रूप, संयुक्त प्रगत शिवाजी रोड मंडळ,मनसे ढोल पथक,माता लक्ष्मीआई मंडळ आदींनी देखील अतिशय सुरेख सहभाग नोंदविला त्यामुळे स्पर्धेत चुरस निर्माण झाली होती.या प्रसंगी नादब्रह्म संगीत विद्यालयाचे प्रमुखव संगीत विशारद विराज किर्लोस्कर यांच्या हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात होता.यावेळी विविध पदाधिकारी,नागरिक, मंडळे आणि युवासेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निकाल वाचन सुरू असताना विवेकभैय्या कोल्हे यांनी सांगा कोण जिंकणार ? असा प्रश्न प्रेक्षकांना विचारला..त्यावर प्रेक्षकांनी फक्त विवेकभैय्या..विवेकभैय्याच जिंकणार असा जल्लोष केला यावेळी मंचावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते संदीप वर्पे आणि शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे व आर पी आयचे देखील पदाधिकारी उपस्थित असल्याने कोपरगाव शहरात तर्क वितर्कांना उधाण आले आहे.