संजीवनी कॉलेजच्या ऋतुजा शिंदे व प्रभज्योत सिंगची जिल्हा बुध्दिबळ स्पर्धेसाठी निवड
संजीवनी कॉलेजच्या ऋतुजा शिंदे व प्रभज्योत सिंगची जिल्हा बुध्दिबळ स्पर्धेसाठी निवड
मैदानी खेळाबरोबरच संजीवनीचे विद्यार्थी बुध्दिचातुर्यातही आघाडीवर
कोपरगांव विजय कापसे दि १६ सप्टेंबर २०२४: संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी ज्युनिअर कॉलेजच्या ऋतुजा समीर शिंदे हिने आपल्या बुध्दिचातुर्याच्या जोरावर वेगवेगळ्या चालींची खेळी करून तालुकास्तरीय बुध्दिबळ स्पर्धेत पाच पैकी पाच फेऱ्या जिंकत आघाडी घेतली तर प्रभज्योत सिंगने चार फेऱ्या जिंकल्या. आता त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहमदनगर व कोपरगांव तालुका क्रीडा समितीच्या वतीने ही स्पर्धा संजीवनी मीडियम स्कूल येथे झाली. ऋतुजा व प्रभज्योत निवडीमुळे संजीवनीचे विद्यार्थी मैदानी खेळाबरोबरच बुध्दीचार्याच्या खेळातही अग्रेसर असल्याचे अधोरेखित झाले,अशी माहिती संजीवनी ज्यु. कॉलेजच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकात दिली आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की तालुका स्तरीय बुध्दिबळ स्पर्धेत १९ वर्षे वयोगटांतर्गत २४ मुलींनी सहभाग नोंदविला तर मुलांच्या स्पर्धेत एकुण ३६ स्पर्धकांनी भाग घेतला होता. संजीवनी ज्यु. कॉलेजमध्ये प्रथम प्राधान्य शैक्षणिक अभ्यासक्रमावर दिल्या जाते तसेच सर्व प्रकारचे खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, वत्कृत्व स्पर्धा, सामुहिक कार्यक्रमाचे प्रतिनिधित्व, इत्यादी बाबींमध्ये भाग घेण्यास प्रवृत्त करून विद्यार्थ्यांच्या कौशल्यांच्या कक्षा रूंदावल्या जातात. याचप्रमाणे बुध्दिबळ सारख्या खेळातही भाग घेण्यास विशेष प्रवुत्त केल्या जाते. कारण या खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये धोरणात्मक नियोजन, स्मरणशक्ती, लक्ष वेधण्याची क्षमता, सर्जनशिलता, कल्पनाशक्ती, संयम आणि चिकाटी, इत्यादी पैलुंची रूजवण होते. तसेच आपले जग स्क्रीन आणि तंत्रज्ञानाने भरलेले आहे आणि मनोरंजनाचे निरोगी प्रकार शोधणे कधीकधी कठीण होऊ शकते. बुध्दिबळ हा एक उत्तम पर्याय आहे कारण त्याला स्क्रीनची आवश्यकता नाही, असे पत्रकात शेवटी म्हटले आहे.
संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी ऋतुजा व प्रभज्योत सह प्राचार्य डॉ. रावसाहेब शेंडगे व बुध्दिबळ मार्गदर्शक प्रा. सागर गांधी यांचे अभिनंदन केले आहे, तसेच ऋुतुजा व प्रभज्योतला जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहे.