आमदार आशुतोष काळेकाळे गट

पाच नंबर पूर्ण केले, आता चारही तळ्यांचे काम हाती घेणार- आ.आशुतोष काळे

पाच नंबर पूर्ण केलेआता चारही तळ्यांचे काम हाती घेणार- आ.आशुतोष काळे

कोपरगावकरांना बाप्पा पावलारविवारपासून मिळणार तीन दिवसाआड पाणी

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १८ सप्टेंबर २०२४ :- कोणीही कितीही अफवा पसरविल्या व कोणी कितीही अडचणी आणल्या तरी आ. आशुतोष काळे यांनी ५ नंबर साठवण तलावाचे काम पूर्णत्वाकडे घेवून जात जलपूजन देखील केले आहे. त्यानंतर विरोधकांना अफवा पसरविण्यासाठी अजिबात संधी न देता उर्वरित एक ते चार तळ्यांचे काम देखील हाती घेणार असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर करून येत्या रविवार (दि.२२) पासून कोपरगावकरांना नियमितपणे तीन दिवसाआड पाणी देणार असल्याची सुखद बातमी आ.आशुतोष काळे यांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी दिली असून कोपरगावकरांना गणपती बाप्पा पावला आहे.

जाहिरात

आ.आशुतोष काळे यांनी मंगळवार (दि.१७) रोजी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास जगताप व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या उपस्थितीत अनंत चतुर्दशीच्या दिवशी पत्रकार परिषद घेवून कोपरगावकरांना आनंदाची बातमी दिली. पत्रकारांशी संवाद साधतांना ते म्हणाले की, १३१.२४ कोटी निधीतून बांधण्यात आलेला ५ नंबर साठवण तलाव पूर्ण झाला असून वितरण व्यवस्थेच्या सुरु असलेल्या कामाबाबत सविस्तर माहिती कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास जगताप यांच्याकडून जाणून घेतली असता कोपरगावकरांचे बहुतांश नळ कनेक्शन अजूनही जुन्या पाईप लाईनवर आहे. नगरपरिषदेच्या माध्यमातून ते नळ कनेक्शन नवीन पाईप लाईनवर शिफ्ट करण्याचं काम तातडीने हाती घ्यावे. जेणेकरून वितरण करतांना अडचण येणार नाही. सर्व कनेक्शन नव्या पाईपलाईनवर आल्यानंतर दररोज पाणी कसे देता येईल यासाठी प्रयत्न करावा व त्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात. नागरिकांना रविवार पासून तीन दिवसाआड पाणी मिळणार आहे. ज्याप्रमाणे पाच नंबर साठवण तलावाचे काम पूर्ण केले त्याप्रमाणे एक ते चारही साठवण तलावाचे काम पूर्ण करायचे आहे. त्यामुळे आपला अपेक्षित ९६० एमएलडी पाणी साठा होऊ शकेल त्या कामांना यानंतर गती देणार आहे. शहरांमध्ये पाण्याच्या टाक्या व वितरण व्यवस्था यांचे थोडेफार अपूर्ण राहिलेले काम लवकरात लवकर पूर्ण करून शहरवासीयांना लवकरात लवकर नियमित पाणी मिळावे यासाठी कोपरगाव नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना आ. आशुतोष काळे यांनी सूचना दिल्या.

जाहिरात

यावेळी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास जगताप म्हणाले की, आ.आशुतोष काळे यांनी दिलेल्या सूचनेवरून रविवार (दि.२२) पासून कोपरगावकरांना तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. हे पाणी पुरवठ्याचे दिवस अजून कमी होवून नागरिकांना नियमित पाणी देण्यासाठी नागरिकांनी आपले नळ कनेक्शन जुन्या पाईपलाईन वरून नवीन योजनेच्या पाईपलाईनवर जोडणी करावे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आपल्या नळाला तोट्या बसवून घ्याव्यात यासाठी नगरपालिकेकडून प्रबोधन करण्यात येणार आहे. नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. कोपरगाव नगरपरिषद प्रशासन देखील आ. आशुतोष काळे यांच्या सूचनेनुसार रविवार पासून तीन दिवसाआड पाणी पुरवठा करणार असून नागरिकांना लवकरात लवकर नियमित पाणी पुरवठा कसा करता येईल यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या सूचनेनुसार कोपरगाव नगरपरिषद प्रशासन प्रयत्न करणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली.

पत्रकार परिषदेत बोलतांना आ.आशुतोष काळे समवेत कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास जगताप व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे