गौतमच्या मुलींनी गाजवले व्हॉलीबॉलचे मैदान; जिल्हास्तरीय स्पर्धेत गौतमकडे तालुक्याचे नेतृत्व
गौतमच्या मुलींनी गाजवले व्हॉलीबॉलचे मैदान; जिल्हास्तरीय स्पर्धेत गौतमकडे तालुक्याचे नेतृत्व
गौतमच्या मुलींनी गाजवले व्हॉलीबॉलचे मैदान; जिल्हास्तरीय स्पर्धेत गौतमकडे तालुक्याचे नेतृत्व
कोपरगाव विजय कापसे दि २१ सप्टेंबर २०२४ :- तालुकास्तरीय मुलींच्या शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा (दि.२०) रोजी संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज, कोपरगाव येथे पार पडल्या. या स्पर्धेत नेहमीप्रमाणे गौतम पब्लिक स्कूलच्या मुलींनी आपले वर्चस्व राखत सलग तीन विजय मिळवत ही स्पर्धा जिंकली आहे. स्पर्धेत खेळताना गौतमच्या मुलींच्या संघाने पहिल्या सामन्यात शारदा इंग्लिश मीडियम स्कूल संघाचा सरळ सेटमध्ये पराभव केला. तर उपांत्यपूर्व सामन्यात महर्षी इंग्लिश मीडियम स्कूल संघावर मात केली. अंतिम सामन्यात आत्मा मलिक स्कूल संघाचा पराभव करून स्पर्धा जिंकली. दि.२४ रोजी श्रीरामपूर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलचा संघ कोपरगाव तालुक्याचे नेतृत्व करणार असल्याची माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिली.
निरंतर कठोर मेहनत, जिद्द, चिकाटीच्या जोरावर गौतम पब्लिक स्कूलच्या दोन्ही मुला-मुलींचे संघ विविध खेळात कोपरगाव तालुक्याचे नेतृत्व जिल्हा स्तरावर सक्षमपणे करत आहे अशा स्तुती सुमनांनी संस्थेच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांनी गौतमचे सर्व खेळाडू, क्रीडा विभाग, प्राचार्य नूर शेख यांचे कौतुक केले. मा.आ.अशोकराव काळे, विश्वस्त व आमदार आशुतोष काळे, सचिव सौ चैतालीताई काळे, सर्व संस्था सदस्य व प्राचार्य नूर शेख यांनी मुलींच्या विजेत्या व्हॉलीबॉल संघाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
मुलींच्या विजेत्या व्हॉलीबॉल संघाचे नेतृत्व कर्णधार पूजा गांगुर्डे व उप कर्णधार वैष्णवी पवार यांनी केले. संघातील पूजा गांगुर्डे, वैष्णवी पवार, आर्या महागावकर, गायके श्रद्धा, प्रियंका पोलगर, मुरुडनर दर्शना आधी खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. गौतमच्या विजेत्या व्हॉलीबॉल संघातील सर्व मुली वस्तीगृहातील असून महाराष्ट्रातील नाशिक, मुंबई, पुणे, अहमदनगर, सोलापूर, संभाजीनगर अशा विविध जिल्ह्यातील आहेत. संघास विजेता बनविण्यासाठी प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षक राजेंद्र आढाव, क्रीडा संचालक सुधाकर निलक, हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे, क्रिकेट प्रशिक्षक इसाक सय्यद यांनी मेहनत घेतली.