काळा इतिहास पुसला जाणार, रविवार पासून कोपरगावकरांना होणार तीन दिवसाआड पाणी पुरवठा-सतीश कृष्णानी
काळा इतिहास पुसला जाणार, रविवार पासून कोपरगावकरांना होणार तीन दिवसाआड पाणी पुरवठा-सतीश कृष्णानी
काळा इतिहास पुसला जाणार, रविवार पासून कोपरगावकरांना होणार तीन दिवसाआड पाणी पुरवठा-सतीश कृष्णानी
कोपरगाव विजय कापसे दि २१ सप्टेंबर २०२४:- आ.आशुतोष काळे यांनी दिलेला शब्द पूर्ण करून ५ नं. साठवण तलावाचे काम पूर्ण झाले असून ५ नं. साठवण तलावात आवश्यक पाणी साठा झाला आहे. त्यामुळे आ.आशुतोष काळे यांनी दिलेल्या सूचनेनुसार ठरल्याप्रमाणे रविवार (दि.२२) पासून तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे त्यामुळे कोपरगावच्या नावावर असलेला काल इतिहास देखील पुसला जाणार असल्याचे ज्येष्ठ व्यापारी सतीश कृष्णानी यांनी म्हटले आहे.
पाणी टंचाई काळात कोपरगावच्या नागरिकांना नळाला चार दिवसांनी, आठ दिवसांनी पाणी काही वेळेस तर महिनाभराने पाणी हे कोपरगावच्या पाचवीलाच पुंजले होते. त्याचा कोपरगाव शहरातील नागरिकांनी व विशेषत: महिलांनी ज्यांचे पाण्याशिवाय कोणतेही काम होवू शकत नाही त्यांनी किती त्रास सहन केला असेल याची कल्पना न केलेलीच बरे. त्यामुळे कोपरगावच्या बाजार पेठेवर झालेले दूरगामी परिणाम व बाजारपेठेतील आर्थिक मंदी हे चिंतेचे विषय झाले होते.
परंतु हि परिस्थिती बदलून दाखविण्याची भीष्म प्रतिज्ञा आ.आशुतोष काळे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी करून कोपरगावच्या नागरिकांना पाणी प्रश्न सोडविण्याबाबत आश्वासित केले होते. त्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी अविरतपणे प्रयत्न करून १३१.२४ कोटी निधी आणून ५ नं.साठवण तलावाचे काम पूर्ण झाले असून वितरण व्यवस्थेचे काम देखील अंतिम टप्यात आहे.
याच आठवड्यात (दि.१५) रोजी आ.आशुतोष काळे व त्यांच्या पत्नी सौ.चैतालीताई काळे यांच्या हस्ते ५ नं.साठवण तलावाचे जलपूजन झालेले असून त्यावेळी ५ नं.साठवण तलावात असलेल्या पाणी साठ्यातून कोपरगावकरांना तीन दिवसाआड पाणी पुरवठा करणे सहज शक्य होते. त्यामुळे आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाला कोपरगावकरांना तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या सूचनेनुसार कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाने तयारी करून रविवार (दि.२२) पासून तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यासाठी नियोजन झाले आहे. पत्रकार परिषदेत आ. आशुतोष काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार (दि.२२) पासून नागरिकांना तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.त्यामुळे कोपरगावचा काळा इतिहास पुसला जावून कोपरगावकर ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते तो दिवस उगवणार असून कोपरगावकरांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असल्याचे सतीश कृष्णानी यांनी म्हटले आहे.