कोल्हे गट
आमदार काळे यांना विमानतळ असलेल्या काकडी गावाचा पडला विसर – भाऊसाहेब सोनवणे
आमदार काळे यांना विमानतळ असलेल्या काकडी गावाचा पडला विसर – भाऊसाहेब सोनवणे
हजारो कोटींच्या खोट्या विमानातून खाली उतरा व मतदारसंघाची खड्डेमय अवस्था बघा
कोपरगाव विजय कापसे दि २१ सप्टेंबर २०२४– कवडीचेही योगदान नसताना श्रेय घेण्यासाठी आमदार आशुतोष काळे हे काकडी विमानतळाचे नाव स्वतःच्या प्रसिध्दीसाठी वापरतात हे दुर्दैव आहे. प्रत्यक्षात विमानतळ विकासासाठी सरकार निधी देतच असते त्यात आमदार काळे यांचे क्षुल्लक देखील योगदान नाही.केवळ पदावर आहे म्हणून विमानतळ प्रशासन यांना औपचारीक्ता पार पाडावी लागते. या गोष्टीचा फायदा घेऊन जनतेत त्यांनी गैरसमज पसरवून जणू काही निधी यांच्यामुळेच आला असे भासवण्याचा प्रकार केला आहे.ज्या गर्वाने ते शेकडो कोटी विमानतळासाठी निधी मिळाला हे बॅनर लावतात त्याच काकडी ग्रामपंचायतचे हक्काचे आठ कोटी तीस लाख देऊ शकत नाही यावरून काकडी गाव मतदारसंघात आहे याचा आमदार आशुतोष काळे यांना विसर पडला आहे असे दिसते अशी प्रतिक्रिया उपसरपंच भाऊसाहेब सोनवणे यांनी दिली आहे.
जर आ.काळे हे एवढे शेकडो हजारो कोटी आणल्याच्या वल्गना करत असतील तर विमानतळाने ग्रामपंचायतचे हक्काचे आठ कोटी तीस लाख आमचे विकासाचे का थकवले ? विमानतळाकडे ग्रामपंचायत कर थकित असून ती रक्कम मिळाल्यास मोठी विकासकामे मार्गी लागू शकतात.काळे हे फोटो काढण्यासाठी फक्त विमानतळावर येतात.मुळातच शिर्डी येथे मोठ्या संख्येने भाविक येतात त्यामुळे हे विमानतळ विकास करणे शासनाचे कर्तव्य असल्याने निधी मिळतो त्यात श्रेय घेणे हे हास्यास्पद आहे.
ज्या गावाने जमिनी दिल्या,सर्व प्रकारचे सहकार्य शासनाला केले त्यामुळे विमानतळ झाले.केवळ प्रसिध्दी हवी म्हणून आमच्या गावात असलेल्या प्रकल्पाला निधी काळे यांनी मिळवून दिला असे त्यांनी बोलणे हे हास्यास्पद आहे.सामान्य जनता ही रोज विमानाने फिरत नाही.जी जनता मतदारसंघात राहते ती खड्डे असलेल्या रस्त्यातून प्रवास करते आहे याचा विसरच जणू काळे यांना पडला आहे.हजारो कोटींचे तुमचे विमान जमिनीवर आणा आणि सत्य परिस्थिती पहा असा घणाघात सोनवणे यांनी आमदार काळे यांच्यावर केला आहे.