कार्यकारी सेवा संस्थांनी स्वावलंबी होण्याची गरज- नितिनराव औताडे
पोहेगांव बुद्रुक नं २ विकास सोसायटीची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
कोपरगाव विजय कापसे दि २४ सप्टेंबर २०२४– स्व. चांगदेवराव गणपतराव औताडे यांनी १९६९ साली पोहेगांव बुद्रुक नं २ विकास सोसायटीची स्थापना करून शेतकरी व सर्वसामान्य सभासदांना अल्प व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देत आधार दिला. पन्नास वर्ष संस्थेचे कामकाज पाहत असताना त्यांनी अत्यंत काटेकोरपणे संस्था सांभाळली, ती टिकवली व वाढवली. त्यांचा सहकारी क्षेत्रावर गाढा अभ्यास होता. त्यांच्या शिकवणीवरच आज संस्थेची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे. संस्थेचा प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. सोसायट्यानी बँकेवर अवलंबून न राहता विविध व्यवसा्याच्या माध्यमातून आपले स्वतःचे उत्पन्नाचे स्रोत्र वाढवणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन संस्थेचे मार्गदर्शक शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी शनिवार दि २१ सप्टेंबर रोजी पोहेगाव बुद्रुक नंबर २ विकास सोसायटीच्या ५५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
एमपीएससी परीक्षेत राज्यात ९ वा क्रमांक मिळवत पोलीस उपनिरीक्षक झालेले अभिषेक जोंधळे यांचा सन्मान करण्यात आला. संस्थेस सहकार भूषण श्री चांगदेवराव गणपतराव पाटील औताडे विकास सोसायटी असे नाव देण्याचा ठराव संमत केल्याबद्दल नितीनराव औताडे यांनी सभासदांचे आभार मानले.