संगमनेर

अमृतवाहिनी पॉलिटेक्निक संगमनेर येथे राज्यस्तरीय तांत्रिक पेपर सादरीकरण स्पर्धेचे यशस्वी आयोजन

अमृतवाहिनी पॉलिटेक्निक संगमनेर येथे राज्यस्तरीय तांत्रिक पेपर सादरीकरण स्पर्धेचे यशस्वी आयोजन
अमृतवाहिनी पॉलिटेक्निक संगमनेर येथे राज्यस्तरीय तांत्रिक पेपर सादरीकरण स्पर्धेचे यशस्वी आयोजन
जाहिरात

संगमनेर प्रतिनिधी विजय कापसे दि २४ सप्टेंबर २०२४- अमृतवाहिनी पॉलिटेक्निक, संगमनेर येथे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ (MSBTE) प्रायोजित राज्यस्तरीय तांत्रिक पेपर सादरीकरण स्पर्धेचे यशस्वी आयोजन २१ सप्टेंबर २०२४ रोजी संगणक व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वतीने करण्यात आले. या स्पर्धेसाठी विविध पॉलिटेक्निक महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांनी आपले पेपर सादर केले. यामधून ३० पेपर्सची निवड करण्यात आली, प्रत्येक पेपरसाठी दोन विद्यार्थ्यांनी आपल्या पॉलिटेक्निक कॅम्पसमध्ये आपले सादरीकरण केले.

जाहिरात
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते माजी शिक्षणमंत्री आमदार बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ. सुधीर तांबे व विश्वस्त शरयूताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी तंत्रनिकेतनने गुणवत्तापूर्ण शिक्षणासह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले आहेत याचबरोबर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी समन्वय केल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना चांगल्या पॅकेजवर सातत्याने नोकऱ्या मिळत आहेत.

जाहिरात

विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढीस लागावी याकरता विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला जात असून राज्यस्तरीय तांत्रिक पेपर सादरीकरण स्पर्धेत या विद्यार्थ्यांनी मोठे यश मिळवले.या कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून  सचिन आहेर (वरिष्ठ प्रणाली प्रशासक, विप्रो टेक्नॉलॉजीज, पुणे),  तुषार कालोगे (सहाय्यक प्राध्यापक, संदीप विद्यापीठ, नाशिक),  निलेश पाटील (संचालक, एनपीआयटी सोल्यूशन प्रा. लि., नाशिक) आणि  अनिरुद्ध कोल्प्याकर (सहाय्यक प्राध्यापक, संदीप विद्यापीठ, नाशिक) यांनी आपली उपस्थिती दर्शवली आणि विद्यार्थ्यांचे सादरीकरण मूल्यांकन केले.

या कार्यक्रमास मान्यवर मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शिंदे साहेब व MSBTE चे प्रतिनिधी प्रा.एस. ए. काळे,शासकीय पॉलिटेक्निक, जालना यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य वी. बी. धुमाळ व उपप्राचार्य जी. बी. काळे यांनी RSM पॉलिटेक्निक नाशिक, अमृतविहिनी पॉलिटेक्निक संगमनेर, आणि गुरु गोविंद सिंह पॉलिटेक्निक नाशिकच्या विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या यशस्वी कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी संगणक विभागप्रमुख जी. बी. काळे,आयटी विभागप्रमुख प्रा. चौधरी निलीमा, समन्वयक प्रा. सुप्रिया बोऱ्हाडे , तसेच संगणक आणि आयटी विभागातील सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे विशेष योगदान लाभले.

जाहिरात मुक्त

या सर्व विद्यार्थ्यांचे काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, विश्वस्त सौ.शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, डॉ.जे.बी.गुरव,प्रा.व्ही.बी.धुमाळ, उपप्राचार्य जी.बी.काळे यांनी अभिनंदन केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे