रोहमारे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय साॅफ्टबाॅल अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड
रोहमारे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय साॅफ्टबाॅल अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड
रोहमारे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय साॅफ्टबाॅल अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड
कोपरगाव विजय कापसे दि २६ सप्टेंबर २०२४–कोपरगाव येथील के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय साॅफ्टबाॅल अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाल्याची माहिती कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.बी.आर.सोनवणे यांनी दिली आहे. अहमदनगर जिल्हा साॅफ्टबाॅल असोसिएशन च्या वतीने दि. २० सप्टेंबर रोजी आबासाहेब काकडे विद्यालय, शेवगाव येथे संघ निवड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
सदर संघात के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयातील १२ वी विज्ञान शाखेचे कु. यश ढेंगिया व कु. निखिल नालकर या दोन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. हे दोनही विद्यार्थी दि. २८ ते ३० सप्टेंबर २०२४ या दरम्यान संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय साॅफ्टबाॅल अजिंक्यपद स्पर्धेसाठी खेळणार आहे. राज्यस्तरीय साॅफ्टबाॅल अजिंक्यपद स्पर्धेसाठी दोन्ही विद्यार्थ्यांच्या झालेल्या निवडीबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, सचिव ॲड. संजीवद कुलकर्णी, विश्वस्त संदिपराव रोहमारे, प्र. प्राचार्य प्रो. (डॉ.) विजय ठाणगे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.बी.आर.सोनवणे यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सुनिता बालवे, यास्मिन शेख, दिपाली पटवर्धन, प्राध्यापक संदिप जगझाप, क्रीडा शिक्षक मिलिंद कांबळे व इतर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.