आपला जिल्हा

शिर्डी पोलिस प्रशासनाने दाखविलेल्‍या तत्‍परतेमुळेच खरातांचे कारनामे उघड झाले – ना.विखे पाटील

शिर्डी पोलिस प्रशासनाने दाखविलेल्‍या तत्‍परतेमुळेच खरातांचे कारनामे उघड झाले – ना.विखे पाटील

शिर्डी पोलिस प्रशासनाने दाखविलेल्‍या तत्‍परतेमुळेच खरातांचे कारनामे उघड झाले – ना.विखे पाटील

जाहिरात

Loni vijay kapse दि २१ मार्च २०२६- शिवानिका संस्‍थानला दारणा प्रकल्‍पातून पाणी देण्‍याचा आदेशाची संपूर्ण चौकशी करण्‍यात येणार असून, हे पाण्‍याचे आरक्षण तातडीने रद्द करण्‍याचे आदेश देण्‍यात आले आहे. महाविकास आघाडी सरकारच्‍या काळात हा निर्णय झाल्‍यामुळे खरात किती उच्‍चपदस्‍थांच्‍या संपर्कात होता हे सुध्‍दा आता उघड झाले असल्‍याची प्रतिक्रीया जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी माध्‍यमांशी बोलताना दिली.

जाहिरात

       ना.विखे पाटील म्‍हणाले की, शिर्डी पोलिस प्रशासनाने दाखविलेल्‍या तत्‍परतेमुळेच खरातांचे कारनामे उघड झाले आहेत. मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याची गंभिर दखल घेवून आरोपीला लुकआऊट नोटीस काढल्‍यामुळे खरात कुठेही पळून जावू शकला नाही. या सर्व प्रक्रीयेमध्‍ये अहिल्‍यानगरचे पोलिस अधिक्षक, शिर्डीचे अतिरिक्‍त पोलिस अधिक्षक आणि पोलिस उपअधिक्षकांसह त्‍यांच्‍या सर्व टिमने अतिशय संयमाने केलेल्‍या तपासामुळेच यासर्व घटना उघड होवू शकल्‍या. शिर्डी पोलिसांनी तयार केलेल्‍या पुराव्‍यांवरच आता नाशिकचे पोलिस तयास करीत आहेत. पोलिसांच्‍या कर्तृत्‍वावर मला शंका नाही परंतू येवढ्या मोठ्या घटना घडत असताना नाशिकचे पोलिस प्रशासन काय करीत होते असा सवालही त्‍यांनी उपस्थित केला.

जाहिरात

       समाज माध्‍यमांमध्‍ये प्रसारीत झालेल्‍या फोटोबाबत स्‍पष्‍टीकरण देताना मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, तत्‍कालिन मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे हे शिर्डीमध्‍ये दर्शनासाठी आले होते. त्‍यानंतर ईशान्‍यश्‍वर मंदिरामध्‍ये दर्शनासाठी गेले होते. पालकमंत्री या नात्‍याने मला त्‍यांच्‍या  दौ-यात बरोबर राहावे लागले. त्‍यांची पुजा होईपर्यंत मी स्‍वत: जिल्‍हाधिकारी आणि जिल्‍हा पोलिस अधिक्षकांसमवेत मंदिरा बाहेर थांबून होते. त्‍यामुळे खरातांशी माझा कुठला संपर्कही नाही. मात्र धर्माच्‍या नावाखाली निरापराध महिलांचे शोषण करणा-या नराधमास ऊशिरा का होईना अटक झाली. यासाठी नेमलेल्‍या विशेष चौकशी पथकातून अधिक माहीती समोर येईल. महिला आयोगाच्‍या अध्‍यक्षा रुपाली चाकणकर यांच्‍या   राजीनाम्‍याचे स्‍वागत करुन, यापुर्वीच त्‍यांनी राजीनामा द्यायला पाहीजे होता अशी प्रतिक्रीयाही मंत्री विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केली.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे