राजकीय मांडवल्या करणारा तो सचिन कोण ? कॉल डिटेल्स काढण्याची कोल्हे गटाची मागणी
अवैध धंदे बंद होण्यासाठी कोल्हे गटाचे २ ऑक्टोबरला आमरण उपोषण
कोपरगाव विजय कापसे दि १ ऑक्टोबर २०२४– कोपरगाव शहरात गोळीबार घटना झाल्याने नागरिक धास्तावले आहेत.त्यात गोळी लागलेली व्यक्तीला रुग्णवाहिकेतून नेत असताना त्याने लोकप्रतिनिधी आणि त्यांचे स्विय सहाय्यक यांचे नावे घेतलेला व्हिडिओ सर्वप्रथम प्रसिद्ध केला.धक्कादायक नावे घेतले आहे.त्यांच्यावर अद्यापही काहीही कारवाई झालेली दिसत नाही.तसेच वाढती गुन्हेगारी ही अवैध व्यवसायामुळे फोफावते आहे. नागरिक, व्यापारी,महिला,लहान मुले अनेकदा या व्यवसायाने त्रस्त होत आहेत.यामुळे व्यसनाधिनता वाढून नागरिकांच्या जिवितीला धोका निर्माण झाला आहे.अद्यापही अवैध धंदे बंद नाहीत तसेच गोळीबार प्रकरणात अन्य नावांची चौकशी करावी अशी मुदत देऊनही कारवाई न झाल्याने भाजपा शहराध्यक्ष दत्ता काले,माधवराव आढाव पतसंस्थेचे चेअरमन विजय आढाव, माजी नगरसेवक बबलू वाणी,संदीप देवकर आदींनी पत्रकार परिषद घेवून २ ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समोर उपोषणास बसण्याचे घोषित केले आहे.
चक्री,बिंगो,कूत्ता गोळी,गांजा यासह अनेक अवैध व्यवसाय सुरू आहे.यामुळे गुन्हेगारी वाढली आहे.नुकतेच झालेल्या गोळीबार प्रकरणात राजकीय नावे वगळण्यासाठी कोणाचा दबाव पोलिसांवर आहे.अनेक मांडवल्या करणारा तो सचिन कोण ? असे प्रश्न उपस्थित केले आहे.यासह अनेक गैर कृत्यात कोण सामील आहेत त्यांचे फोन कॉल डिटेल्स काढण्यात यावे.तहसील पुरवठा अधिकारी नक्की कुणाच्या दबावात जिवानिशी गेला आहे त्याचेही सीडीआर काढून चौकशी करण्यात यावी आणि खऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रत्येक वेळी रेशन घोटाळा आणि अवैध धंदे बंद व्हावे यासाठी युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी आवाज उठवला आहे.पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन दहा दिवसात या घटनेचा छडा लावून ज्याला गोळ्या लागल्या त्याने घेतलेल्या नावांची अद्यापही चौकशी झाली नाही हे कायदा सुव्यवस्था पायदळी तुडवल्याचे लक्षण आहे.सत्तेचा गैरवापर करून फसवणूक सुरू आहे.ज्यांनी आमच्या नेत्यांवर खोटे कुभांड रचून स्वतःचे पाप झाकण्याचा प्रयत्न केला त्यांना जाहीर आव्हान देत गैरकृत्यांचा पेन ड्राईव्ह पत्रकार परिषदेत दाखवला गेला त्यामूळे विरोधी गोटातील अनेक चेहरे हे त्या पातळीवर गेल्यास उघड होतील असे सूचित करण्यात आले आहे.अतिशय खालच्या दर्जाचे राजकारण करणाऱ्या विरोधकांनी आपले वाईट कामे झाकण्यासाठी जर आमच्या नेत्यांवर टीका केली तर खरे या गुन्हेगारीचे मालक कोण हे समोर येईल आणि अनेकांचे कारनामे उघड होतील.
प्रत्यक्षात मूळ मुद्दा गोळीबार प्रकरणात असनाऱ्यांचे सिडिआर तपासले जावे या आग्रही मागणीसाठी हे उपोषण होणार आहे.विवेकभैय्या कोल्हे यांनी तरुणांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी रोजगार मेळावा आयोजित केल्याने विरोधकांना अवैध व्यवसाय करण्यासाठी तरुण मिळणार नाहीत आणि सत्ता गेल्यावर ते बेकार होणार आहेत या भीतीपोटी मूळ विषय भरकटवण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांनी केला आहे.आम्ही उपोषण करून अवैध व्यवसाय बंद व्हावे यासाठी परखड भूमिका घेत आहोत असे स्पष्ट करण्यात आले.