दिवाळीच्या अगोदरच लाडक्या बहिणींना ओवाळणी; तिसऱ्या महिन्याचे दीड हजार खात्यावर जमा होण्यास सुरुवात -आ.आशुतोष काळे
दिवाळीच्या अगोदरच लाडक्या बहिणींना ओवाळणी; तिसऱ्या महिन्याचे दीड हजार खात्यावर जमा होण्यास सुरुवात -आ.आशुतोष काळे
दिवाळीच्या अगोदरच लाडक्या बहिणींना ओवाळणी; तिसऱ्या महिन्याचे दीड हजार खात्यावर जमा होण्यास सुरुवात -आ.आशुतोष काळे
कोपरगाव विजय कापसे दि १ ऑक्टोबर २०२४– महायुती शासनाने राज्यातील माता-भगिनींसाठी सुरु केलेली ‘माझी लाडकी बहीण’ या योजनेचे तिसऱ्या महिन्याचे दीड हजार रुपये तर ज्या माता भगिनींच्या काही कागदपत्रांची किंवा केवायसी अपुर्तता असल्यामुळे आजपर्यंत एकही महिन्याचे पैसे मिळाले नाही त्यांच्या खात्यावर साडे चार हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली असून महायुती शासनाने दिवाळीच्या अगोदरच लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी दिली असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.
महिला भगिनींना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी महायुती शासनाने राज्यातील माता-भगिनींसाठी ‘माझी लाडकी बहीण’ योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जात आहेत. कोपरगाव मतदार संघातील पात्र लाभार्थी माता-भगिनींना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरासह मतदार संघातील प्रत्येक गावात सहाय्यता केंद्र सुरू करून हजारो महिलांच्या आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून देवून पात्र महिलांना प्रतिमहिना दीड हजार रुपये मिळत आहेत.
या योजनेच्या सुरुवातीला कागदपत्रांच्या येणाऱ्या अडचणी लक्षात घेवून माता-भगिनींना त्रास होवू नये यासाठी महायुती शासनाने बहुतांश कागदपत्रांची अट रद्द करून जास्तीत जास्त माता-भगिनींना या योजनेचा लाभ कसा घेता येईल त्यासाठी इतरही अटी शिथिल केल्यामुळे मतदार संघातील हजारो माता भगिनींना या योजनेचा लाभ मिळण्यास मदत झाली आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार हे कोपरगाव येथे आले असता त्यांनी माता-भगिनींच्या खात्यावर जुलै व ऑगस्ट महिन्याचे एकूण तीन हजार रुपये जमा होणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर दोनच दिवसात माता-भगिनींच्या खात्यावर पैसे जमा झाले. त्यानंतर तिसऱ्या महिन्याचे दीड हजार रुपये कधी येणार याची माता भगिनींना प्रतीक्षा लागली होती. ती प्रतीक्षा महायुती शासनाने ऑक्टोबर महिन्याच्या एक तारखेलाच संपवून महिलांच्या बँक खात्यात दीड हजार रुपये तर ज्या महिलांच्या काही कागदपत्रांची किंवा केवायसी अपुर्तता असल्यामुळे आजपर्यंत एकही महिन्याचे दीड हजार रुपये मिळाले नव्हते त्या महिलांच्या बँक खात्यात तीन महिन्याचे एकाच वेळेस साडे चार हजार रुपये जमा केले आहेत.
गुरुवार पासून ‘नवरात्र’ सण म्हणजे स्त्री शक्तीच्या पूजेचा सण सुरु होत असून माता भगिनींच्या बँक खात्यावर दीड हजार तर काही महिलांच्या खात्यावर साडे चार हजार रुपये जमा झाले असून नवरात्र व येणाऱ्या दसरा, दिवाळी सणाचा माता-भगिनींचा उत्साह द्विगुणीत झाला आहे व महिला भगिनींना दिवाळीच्या अगोदरच महायुती शासनाने भाऊबीजेची ओवाळणी दिली असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांचे मतदार संघातील माता भगिनींच्या वतीने आभार मानले असून ‘माझी लाडकी बहीण’ योजना यापुढेही अखंडपणे सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
माता भगिनींचे आशीर्वाद निश्चितपणे पाठीशी राहतील—
संसार कसाही असला, तरी गळ्यातला हार मानून त्याचा स्वीकार करणारी माता भगिनी रात्रंदिवस कष्ट करून कुटुंबाचा डोलारा सांभाळते. स्त्री आणि पुरुष ही जरी संसाररुपी रथाची दोन चाके असल्याचे म्हटले जाते परंतु या संसारुपी रथाचा तोल सावरला जातो तो स्त्रीमुळेच.त्यामुळे सर्व आघाड्यांवर लढतांना संसारात तिचे अस्तित्व नेहमीच अधोरेखित होते.परंतु हे सर्व करीत असतांना काही वेळा तिला येणाऱ्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी महायुती शासनाने सुरु केलेली ‘माझी लाडकी बहिण’ योजना माता भगिनींसाठी अत्यंत फायदेशीर ठरली असून माता भगिनींचे आशीर्वाद निश्चितपणे पाठीशी राहतील.
-आ.आशुतोष काळे.