काळे गट

गौतम सहकारी बँकेस जिल्हा बँक्स असोसिएशनकडून एकाच वेळी दोन पुरस्कार प्रदान

गौतम सहकारी बँकेस जिल्हा बँक्स असोसिएशनकडून एकाच वेळी दोन पुरस्कार प्रदान

गौतम सहकारी बँकेस जिल्हा बँक्स असोसिएशनकडून एकाच वेळी दोन पुरस्कार प्रदान

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २ ऑक्टोबर २०२४ :- सहकारी बँकिंग क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या गौतम सहकारी बँकेस अहमदनगर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन मर्यादित,अ.नगर यांचेकडून आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या स्थितीवर Best Perfomance in NPA Management  Growth & Services  व Best Performance in Training Session ह्या वर्गवारी मध्ये दोन पुरस्कार एकाच वेळी  देण्यात आले आहे अशी माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे व प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमूड यांनी दिली आहे.

जाहिरात नोकरी मेळावा

कर्मवीर शंकररावजी काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न सहकारी संस्थाचे संस्थापक कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या आदर्श शिस्तीवर गौतम बँकेची वाटचाल सुरू आहे. बँकेचे जेष्ठ मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या नेतृत्वाखाली व आमदार आशुतोष काळे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अत्याधुनिक प्रणालीचा वापर करून बँकेचे संपूर्ण कामकाज संगणकीकृत करण्यात आले आहे. त्याचबरोबर ऑडिटचा ‘अ’ वर्ग दर्जा राखला असून बँकेने रिझर्व्ह बँकेचे FSWM चे निकष पूर्ण केले आहे. तसेच बँकेने चालू वर्षात नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यात खेडले झुंगे व येवला शहरात नवीन दोन शाखा सुरू केल्या आहेत. बदलत्या काळाबरोबर बँकेने मोबाईल बँकिंगची सुविधा देखील सुरू केली असून लवकरच UPI सेवा ग्राहकांच्या सेवेसाठी सुरू करणार आहे. त्याचप्रमाणे बँकेच्या कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित केले आहे.

जाहिरात

त्याचबरोबर ठेवीदार, सभासद यांचा विश्वास सांभाळताना एनपीए देखील कमी केला आहे.गौतम बँकेचे ही दोन्ही कामे कौतुकास्पद असून त्याची नागरी सहकारी बँक असोसिएशनने दखल घेत गौतम बँकेला नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या वतीने शिर्डी येथे झालेल्या कार्यक्रमात असोसिएशनचे अध्यक्ष सत्यन मुदंडा,उपाध्यक्ष शिवाजी व्यवहारे,  मालपाणी उद्योग समुहाचे संचालक राजेशजी मालपाणी यांच्या हस्ते हे दोन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

जाहिरात

गौतम सहकारी  बँकेला अहमदनगर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने दोन पुरस्कार देऊन गौरवण्यात आल्याची माहिती बँकेचे व्हाईस चेअरमन श्री बापूराव जावळे यांनी दिली. शिर्डी येथे नुकतेच संपन्न झालेल्या अहमदनगर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या कार्यक्रमात बँकेला एनपीए कमी राखल्याबद्दल व कर्मचारी प्रशिक्षण या वर्गवारी मद्ये पुरस्कार देण्यात आले त्यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष सत्यन मुदंडा,उपाध्यक्ष व्यवहारे, प्रतिष्ठित उद्योजक राजेश मालपाणी यांच्या हस्ते बँकेचे व्हा. चेअरमन  बापूसाहेब जावळे बँकेचे प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमूड, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत तिरसे, संचालक राजेंद्र ढोमसे, बापूसाहेब वक्ते, रामराव माळी,उत्तम भालेराव, शरद होन आदींसह विविध मान्यवरांनी हा पुरस्कार संयुक्तपणे स्वीकारला.

जाहिरात मुक्त

यावेळी उपाध्यक्ष बापूराव जावळे म्हणाले की, मा. आ. अशोकराव काळे व विद्यमान आ. आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली बँकेचे सर्व संचालक मंडळ व अधिकारी कर्मचारी एक जुटीने काम करीत आहे. सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी सकारात्मक भावनेतून बँक कामकाज करत असल्याने हा पुरस्कार बँकेला मिळालेला असून हा पुरस्कार सर्वांच्या एकत्रित कामाचा गौरव असल्याचे म्हटले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे