समता पतसंस्था

राघवेश्वर मंदिरात  ४०२ नागरिकांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ

राघवेश्वर मंदिरात  ४०२ नागरिकांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ
राघवेश्वर मंदिरात  ४०२ नागरिकांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ
जाहिरात नोकरी मेळावा

कोपरगाव विजय कापसे दि २ ऑक्टोबर २०२४– : आत्ताची बदलती जीवन शैली व नियमित व्यायाम, चांगली झोप, योग्य आहार, व्यसनापासून दूर राहणे, योग, प्राणायाम, नियमित आरोग्य तपासणी, तणाव मुक्त जीवन अंगीकार करण्याची गरज आहे. त्याचे प्रत्येकाने जीवन शैलीत बदल करून आपले आयुष्यमान वाढवावे. असे प्रतिपादन नाशिक येथील हृदय रोग तज्ञ डॉ.अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी केले.

जाहिरात
   जागतिक हृदय रोग दिनानिमित्त राघवेश्वर जागृत देवस्थान कुंभारी व नाशिक येथील श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट रिसर्च सेंटर आणि मॅग्नम ग्रुप ऑफ हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत हृदय रोग व मधुमेह निदान शिबिर राघवेश्वर जागृत देवस्थानचे मठाधिपती राघवेश्‍वरानंदगिरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. त्या वेळी ते बोलत होते.

जाहिरात
    शिबिराची सुरुवात डॉ.मनोज चोपडा यांच्या हृदयरोग या  विषयीच्या व्याख्यानाने झाली. त्यांनी बाल वयात होणाऱ्या हृदयरोगा बद्दल सविस्तर माहिती सांगितली. तसेच साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट रिसर्च सेंटरचे एम.डी. मेडिसिन डॉ.कुणाल निकम, अतिदक्षता तज्ञ डॉ.शैलेश बडवर तर मॅग्नम ग्रुप ऑफ हॉस्पिटलचे एम.डी. मेडीसिन डॉ.विजय साळुंखे, डॉ.विजय गोडगे, डॉ.विजय कदम, डॉ.विजय साळुंखे, डॉ.अनिकेत खोस्कर, डॉ. विलास आचारी यांचे सहकार्य लाभले.

जाहिरात
    प्रसंगी तपासणी अंती रक्तातील साखर, ईसीजी , बीपी, मधुमेही रुग्णाची मागील तीन महिन्याची साखर तपासणी देखील करण्यात आली. तसेच ज्या रुग्णांना अँजीओग्राफी , अँजिओप्लास्टी, बायपास करावयास सांगितले आहे अशा रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत सर्व सुविधा नाशिक येथील श्री साईबाबा हार्ट इन्स्टिटयूटमध्ये सातत्याने होतात अशी माहिती  जनसंपर्क अधिकारी श्री सचिन चव्हाण व मॅग्नम ग्रुपचे मधुकर पवार यांनी दिली.

जाहिरात मुक्त
   प्रसंगी राघवेश्वर जागृत देवस्थानचे मठाधिपती राघवेश्‍वरानंदगिरी महाराज यांनी उपस्थित राहून आशीर्वाद दिले. कुंभारी ग्रामपंचायतीच्यावतीने प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शिबिरा प्रसंगी उपस्थित डॉक्टरांचे औक्षण करून, फेटे  बांधून, ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.  महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. शिबीर यशस्वीतेसाठी कुंभारी येथील राघवेश्वर जागृत देवस्थान, उमंग युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी, मित्र परिवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या मोलाच्या सहकार्यात सतीश निळकंठ यांनी केलेल्या विशेष सहकार्याबद्दल त्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.उपस्थितांचे आभार दिनेश साळुंखे यांनी मानले.
 वैद्यकीय क्षेत्रातील डॉ.अनिरुद्ध धर्माधिकारी व डॉ.मनोज चोपडा ही जोडगोळी एकत्र आणून गावातील रुग्णांची सेवा आयोजकांनी केली. दरवर्षी जागतिक हृदय दिनानिमित्त अशा प्रकारचे भव्य स्वरूपाचे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करावे. त्या शिबिरांचा कुंभारी गावातील नागरिकांबरोबरच आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी लाभ घ्यावा.
 चैताली आशुतोष काळे 

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे