आपला जिल्हा

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयातील अद्वैत “आदर्श विद्यार्थी” पुरस्काराने सन्मानित

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयातील अद्वैत “आदर्श विद्यार्थी” पुरस्काराने सन्मानित

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयातील अद्वैत “आदर्श विद्यार्थी” पुरस्काराने सन्मानित

जाहिरात

अहिल्यानगर विजय कापसे दि ६ ऑक्टोबर २०२४रयत शिक्षण संस्था सातारा कर्मवीर विद्या प्रबोधिनीमार्फत संस्थेच्या वर्धापन दिनी म्हणजेच ४ ऑक्टोबर २०२४ रोजी अहमदनगर येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी अद्वैत विवेक गहाणडूले यास सर्वगुणसंपन्नतेमुळे आदर्श विद्यार्थी पुरस्काराने सातारा येथे वर्धापन दिन कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील तथा अण्णा यांनी बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण प्रसाराचे माध्यम म्हणून रयत शिक्षण संस्थेची स्थापना ४ ऑक्टोबर १९१९ रोजी केली. या ध्येयपूर्तीसाठी त्यांची असलेली आत्यंतिक तळमळ, करीत असलेला असिम त्याग आणि ते करीत असलेली अविरत धडपड पाहून अनेक थोर लोकांनी उत्स्फूर्तपणे वेगवेगळ्या मार्गांनी सहकार्य केले, त्यातून संस्थेचा विकास होत गेला. रयत शिक्षण संस्थेच्या बांधणीसाठी योगदान दिलेल्या अशा थोर व्यक्तींच्या स्मरणार्थ संस्थेच्या पाचही विभागात दरवर्षी चार ऑक्टोबर रोजी मान्यवर व्यक्तींच्या नावाने वेगवेगळे पुरस्कार दिले जातात. संस्थेच्या प्रत्येक विभागातून प्रत्येक पुरस्कारासाठी निकषानुसार प्रस्ताव मागवून मुलाखती घेऊन पारदर्शी निवड केली जाते. अशी माहिती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका छाया काकडे यांनी दिली.

जाहिरात

यामध्ये संस्थेच्या उत्तर विभागातून अहमदनगर येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयातील अद्वैत विवेक गहाणडुले या विद्यार्थ्याचा  दादापाटील आदर्श विद्यार्थी पुरस्कारासाठी निवड होऊन सातारा येथील वर्धापन दिन कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप गौरवचिन्ह, प्रमाणपत्र, कर्मवीर अण्णांचे जीवन चरित्रपर पुस्तक व संस्था शाल असे होते.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे डॉ. वसंत काळपांडे, माजी शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे, अध्यक्ष  चंद्रकांत दळवी,चेअरमन रयत शिक्षण संस्था सातारा, प्रमुख उपस्थिती  ॲड.भगीरथ शिंदे, व्हा. चेअरमन रयत शिक्षण संस्था,  डॉ. अनिल पाटील, संघटक रयत शिक्षण संस्था,  ज्ञानदेव म्हस्के कुलगुरू, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सर्व संस्था मॅनेजिंग कौन्सिल सदस्य,जनरल बॉडी सदस्य व इतर तसेच संस्था हितचिंतक उपस्थित होते.

जाहिरात

या उत्तुंग यशाबद्दल आदर्श विद्यार्थी अद्वैत गहाणडुले तसेच मार्गदर्शक आई- वडील रयत सेवक जयश्री, विवेक गहाणडुले यांचे रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय सल्लागार समितीचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य  दादाभाऊ कळमकर, जनरल बॉडी सदस्य  ज्ञानदेवराव पांडुळे, अभिषेक कळमकर, अर्जुनराव पोकळे, स्कुल कमिटी सदस्य अंबादास गारुडकर , सल्लागार समिती सदस्य डॉ. विश्वासराव काळे, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे व बाबासाहेब नाईकवाडी, मुख्याध्यापिका छाया काकडे, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजीराव लंके, ज्येष्ठ शिक्षक महादेव भद्रे मार्गदर्शक- वर्गशिक्षक अमित धामणे, सर्व सेवकवृंद, हितचिंतक, पालक, विद्यार्थी यांनी अभिनंदन, कौतुक करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे