त्या समाज विद्रोह्यांना अण्णाभाऊ साठेंपेक्षा कोल्हेंच्या नातवावर जास्त प्रेम
त्या समाज विद्रोह्यांना अण्णाभाऊ साठेंपेक्षा कोल्हेंच्या नातवावर जास्त प्रेम
येणाऱ्या निवडणुकीत मातंग समाज याचा बदला घेईल -नितीन साबळे
कोपरगाव विजय कापसे दि ६ ऑक्टोबर २०२४ :- ज्यांच्या बगलबच्यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या शासकीय पद्धतीने होणाऱ्या अनावरणापासून वंचित ठेवले त्याचा बदला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मातंग समाज घेतल्याशिवाय राहणार नाही व मातंग समाज कोल्हेंना येणाऱ्या निवडणुकीत वंचित ठेवल्याशिवाय राहणार नाही असा ईशारा लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीचे सचिव नितीन साबळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिला आहे.
कोल्हेंनी चाळीस वर्ष सत्ता भोगली त्यांचे कार्यकर्ते असेलेले मातंग समाजाचे विनोद राक्षे नगराध्यक्ष असतांना त्याचे देखील समाजासाठी कोणतेही योगदान मिळाले नाही. मागील अनेक वर्षापासून रखडलेले साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी पुढाकार घेवून आण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिनभाऊ साठे यांच्या हस्ते सोमवार (दि.०७) रोजी अनावरण ठरले होते. मात्र कोल्हे कुटुंबांच्या हस्ते अनावरण होणार नाही व पत्रिकेत कोल्हे कुटुंबांच्या सदस्यांचे उद्घाटक व अध्यक्ष म्हणून नाव नाही त्यामुळे आपल्या बगल बच्यांना पुढे करून हा अनावरण कार्यक्रम रद्द करण्याचा प्रयत्न कोल्हे कुटुंबाने पुन्हा एकदा केला आहे.
काही समाजविद्रोह्यांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नातवापेक्षा कोल्हेंच्या नातवावर जास्त प्रेम असल्याचे यानिमित्ताने दिसून आले आहे. त्यामुळे या समाजाच्या गद्दारांनी कोल्हेंच्या नातवाच्या आदेशावर हा अनावरण सोहळा रद्द करण्यासाठी मोठ्या प्रमाणात हातभार लावला आहे.या मातंग समाजाच्या गद्दारांना समाज तर कधी माफ करणारच नाही मात्र येत्या विधानसभा निवडणुकीत याचा बदला घेवून मातंग समाज कोल्हेंना निवडणुकीत वंचित ठेवणार असल्याचे सचिव नितीन साबळे यांनी म्हटले आहे.