कोल्हे गट

माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त बचत गटांना २ कोटी ५१ लाखांचे कर्जवितरण 

माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त बचत गटांना २ कोटी ५१ लाखांचे कर्जवितरण 
माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त बचत गटांना २ कोटी ५१ लाखांचे कर्जवितरण 

कोपरगाव विजय कापसे दि ८ ऑक्टोबर २०२४कोपरगाव मतदारसंघाच्या मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संजीवनी स्वयं सहाय्यता महिला बचत गटांना २ कोटी ५१ लाखांचे कर्ज वितरण करण्यात आले. येसगाव,चांदेकसारे, चासनळी,दहेगाव बोलका येथे सदर कार्यक्रम पार पडला.

जाहिरात

महिला बचत गटांची सुरुवात अत्यंत कठीण परिस्थितीत झाली.त्या काळी महिलांना आर्थिक अधिकार मिळण्यासाठी सामाजिक विचारसरणी बदलून काम करण्याची गरज ओळखून मी या कामाला सुरुवात केली.सद्या जवळपास तीन हजार बचत गटांचे जाळे आपण उभारले आहे. तीस हजारहून अधिक महिला आज आर्थिक सक्षम होण्यासाठी मदत मिळाली.माझ्या वाढदिवसाला ज्यांच्यासाठी मी नेहमी काम करत आले त्यांच्यात मला उपस्थित राहता येऊन शुभेच्छा मिळाल्या हे आनंदाचे क्षण आहेत.स्व.कोल्हे साहेबांनी सेवा हाच धर्म ही शिदोरी दिली आहे त्यावर आम्ही कार्यरत आहोत.

जाहिरात

माझे काम हे महिलांचे आयुष्य उज्वल  करण्यासाठी होते व यापुढेही असेल.महिला ही अतिशय प्रतिकूल परिस्थिती पुढे जात असते.समाजाने महिलांना समजून घेऊन त्यांना योग्य सन्मान देण्याची गरज आहे.विविध महिला अत्याचाराच्या घटना घडतात त्यावेळी मन व्यथीत होते.कुटुंब आणि समाज या चौकटीत आयुष्य जगताना एक स्त्री तारेवरची कसरत करते त्यामागे पुरुष वर्गाने देखील साथ दिली तर महिला काय क्रांती करू शकतात हे अनेक उदाहरण आपण पाहिले आहे.जिथे महिलांची हाक येईल तिथे मी सोबत असेल असे सौ.कोल्हे म्हणाल्या.

जाहिरात
यावेळी विविध कर्ज मंजुरी झालेले बचत गटाच्या महिला भगिनी तसेच येसगाव बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या मॅनेजर पूजा आहेर या उपस्थित होत्या.
ओम साई राम महिला बचत गट येसगावच्या महिला भगिनी मोल मजुरीचे काम करून त्या पैशातून होणारी बचतीतून नवरात्रीत फराळाची पंगत देतात.यासह गाव सप्ताहची मोठी पंगत देखील गटाने दिलेली आहे.यामुळे बचत गटाच्या महिला भगिनी सामाजिक योगदानात किती अग्रेसर आहेत हे सर्वांसाठी आदर्शवत आहे असे दिसते – सौ.स्नेहलताताई कोल्हे 

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे