कोपरगावसह महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे काम करून दाखवेल – विवेकभैय्या कोल्हे
तिळवणी बंधाऱ्याचे विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते जलपूजन संपन्न
कोपरगाव विजय कापसे दि ८ ऑक्टोबर २०२४–तिळवणी येथील तळवाडे नाल्यावरील एकूण चार साठवण बंधारे पालखेड कालवा चारी नंबर ५१ वरून भरून देण्यात आले, या बंधाऱ्यांचे जलपूजन युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी रवींद्र शिंदे,सुरेश शिंदे,ज्ञानेश्वर शिंदे यांनी सपत्नीक विधिवत जलपूजा केली.
या वेळी बोलताना विवेकभैय्या कोल्हे म्हणाले की पाऊस झालेला असतानाही या काही वर्षात हक्काचे पाणी मिळण्यासाठी भांडावे लागते हे दुर्दैव आहे.जेव्हा गोदावरीचे पाणी डोळ्यादेखत वाहून जाते तेव्हा आपली शेती उजाड होते हे माहीत असून समन्यायी काळा कायदा डोळे झाकून मंजूर केला.स्व.कोल्हे साहेबांनी पूर्व भागावर विशेष प्रेम केले.स्व.साहेब गेल्यानंतर जर काही संपत्ती मागे ठेवली असेल तर जीवाला जीव देणारे कार्यकर्ते आयुष्याच्या तिजोरीत जोडून दिले आहे.मला काम करण्यावर विश्वास आहे दिवसेंदिवस तीन हजार तर कधी साडे तीन हजार असे हजारो कोटी फ्लेक्सवर वाढत आहे प्रत्यक्षात मात्र मतदारसंघ अनेक वर्षे मागे गेला आहे.
पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळवले तर शेती,उद्योग आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघेल.स्नेहलताताई कोल्हे यांनी निळवंडे धरणाचे काम पूर्ण होऊन चाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागावे यासाठी अधिवेशनात पायरीवर बसून आंदोलन केले.मला काम करून डोळ्यांना दिसेल प्रत्यक्षात तुम्हाला विश्वास बसेल असा विकास करण्याला प्राधान्य द्यायचे आहे. केवळ कोपरगाव आणि परिसरच नाही तर महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे काम करून दाखवेल असे विवेकभैय्या कोल्हे म्हणाले.
विरोधकांचे काम शून्य आणि प्रसिध्दी जास्त असा बालिश प्रकार सुरू आहे.केवळ वेड्यात काढून आपले निवडणुकीचे राजकारण साध्य करायचे आणि वेळ निघून गेली की परत तुम्ही कोण आम्ही कोण असे वागायचे हे काळे कुटुंबाचे काम आहे अशी भावना उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली.