आ. आशुतोष काळेंचा पाठपुरावा, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पिक विम्याचे ४४.४२ कोटी बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात -आ. आशुतोष काळे
आ. आशुतोष काळेंचा पाठपुरावा, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पिक विम्याचे ४४.४२ कोटी बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात -आ. आशुतोष काळे
आ. आशुतोष काळेंचा पाठपुरावा, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पिक विम्याचे ४४.४२ कोटी बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात -आ. आशुतोष काळे
कोपरगाव विजय कापसे दि ११ ऑक्टोबर २०२४ :- २०२३ च्या खरीप हंगामात पावसाचा दीर्घकाळ खंड पडल्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्या नुकसानीपोटी २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई मिळाली होती परंतु पिक विम्याची उर्वरित रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळावी यासाठी आ.आशुतोष काळे यांनी केलेल्या पाठपुराव्यातून पिक कापणी आधारित नुकसान भरपाई पोटी पिक विम्याचे ४४.४२ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानी पासून दिलासा मिळावा यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत खरीप हंगाम २०२३ च्या खरीप हंगामात दीर्घकाळ पावसाचा खंड पडून झालेल्या नुकसान भरपाई पोटी कोपरगाव मतदार संघातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती नुसार २५ टक्के अग्रीम ३५ कोटी ४ लाख व स्थानिक नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई १२ लाख मिळवून दिली होती.उर्वरित नुकसान भरपाईची रक्कम मिळावी यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरु होता.त्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री ना.अजितदादा पवार व कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्याकडे वेळोवेळी मागणी केली होती. त्या मागणीची दखल घेवून महायुती शासनाने कोपरगाव तालुक्यातील खरीप हंगाम २०२३ च्या खरीप हंगामात दीर्घकाळ पावसाचा खंड पडून झालेल्या नुकसानीचे पिक कापणी आधारित नुकसान भरपाई पोटी पिक विम्याचे ४४.४२ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे. पहिली ३५ कोटी १६ लाख व उर्वरित ४४ कोटी ४२ अशी एकूण ७९.५८ कोटीची खरीप हंगाम २०२३ मधील नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळवून दिली आहे.
२०२४ चा खरीप हंगाम बहुतांश आटोपत आला असून पाण्याच्या नियोजनानुसार शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामाची तयारी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे या रब्बी हंगामाच्या तयारीसाठी आवश्यक असणारी आर्थिक मदत या उर्वरित पिक विम्याच्या रक्कमेतून जवळपास ४६ हजार शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच काही दिवसांवर दिवाळी सण येवून ठेपलेला असून या सणाची खरेदी करण्यासाठी देखील शेतकऱ्यांना या पिक विम्याच्या रक्कमेची निश्चितपणे मदत होणार आहे. त्याबद्दल आ. आशुतोष काळे यांनी मतदार संघातील शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस,उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार, कृषी मंत्री ना.धनंजयजी मुंडे यांचे आभार मानले आहे.