शुक्राचार्य ट्रस्ट

शुक्राचार्य मंदिरात साजरा होणार जल्लोषात दसरा उत्सव 

शुक्राचार्य मंदिरात साजरा होणार जल्लोषात दसरा उत्सव 
शुक्राचार्य मंदिरात साजरा होणार जल्लोषात दसरा उत्सव 
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १२ ऑक्टोबर २०२४जिथे कोणतेही शुभकार्य करण्यास मुहूर्त पाहावा लागत नाही असे एकमेव कोपरगाव शहरातील गोदावरी नदी किनारी वसलेल्या बेट भागातील परम सद्गुरू शुक्राचार्य मंदिरात आज शनिवार दि १२ ऑक्टोबर रोजी म्हणजेज दृष्ट शक्ती वर मिळवलेला विजय दिवस आपण सर्व जण हा पावित्र दिवस ” विजय दिवस – म्हणजेच विजया दशमी – दसरा म्हणून साजरा केला जाणार असल्याची माहिती ट्रस्ट च्या वतीने देण्यात आली आहे.

जाहिरात
 या विषयी ट्रस्ट पदाधिकाऱ्यांनी अधिक माहिती देतांना सांगितले की, या दिनाचे औचित्य  साधत आपल्या गुरू शुक्राचार्य महाराज मंदिरात दर वर्षी आपण ” शस्त्र पूजन ” करत महाराजांची पालखी वाजत गाजत दुपारी ४ वाजता जुनी गंगा येथे सीमोल्लंघन साठी जात असते तरी आपण सर्व भाविक भक्तांनी आज सकाळी ठीक ९.३०  वाजता परम सद्गुरू शुक्राचार्य मंदिरात शस्त्र पूजन करण्यासाठी तसेच सायंकाळी ४ वाजता पालखी साठी मंदिरात उपस्थित राहावे.

जाहिरात

असे आवाहन परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज ट्रस्ट समिती अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड, सचिव संजीव कुलकर्णी,खजिनदार गजानन कोराळकर, सदस्य सुहास कुलकर्णी, हेमंत पटवर्धन, मंदिर प्रमुख सचिन परदेशी, उपमंदिर प्रमुख प्रसाद पर्हे सदस्य संजय वडांगळे, आदिनाथ ढाकणे, अरुण जोशी, विशाल राऊत, बाळासाहेब लकारे, सुजित वरखेडे, विलास आव्हाड, दत्तात्रय सावंत, महेंद्र नाईकवाडे, मुन्ना आव्हाड, बाळासाहेब गाडे, विजय रोहम, दिलीप सांगळे, विकास शर्मा, भागचंद रुईकर, मधुकर साखरे व्यवस्थापक राजाराम पावरा आदीनी केले आहे.

शुक्राचार्य महाराज 

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे