कोल्हे गटविवेक कोल्हे

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना उस भावात मागे राहणार नाही-विवेकभैय्या कोल्हे

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना उस भावात मागे राहणार नाही-विवेकभैय्या कोल्हे
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना उस भावात मागे राहणार नाही-विवेकभैय्या कोल्हे
कोपरगाव विजय कापसे दि १२ ऑक्टोबर २०२४माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी शेतक-यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सतत संघर्ष करत त्या तुलनेत योगदान दिले असुन त्याच पावलांवर पाउल ठेवुन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली साखर कारखानदारीत आपले मार्गाक्रमण सुरू असुन उस भावात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कधीच मागे नव्हता आणि आताही राहणार नाही, शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू अशी ग्वाही कारखान्याचे अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी दिली. दिवाळीनिमीत्त कामगारांना २० टक्के सानुग्रह अनुदान देण्याची घोषणाही त्यांनी केली.

जाहिरात
         
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या ६२ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नीप्रदिपन समारंभ विजयादशमीच्या मुहुर्तावर शनिवारी कारखान्याचे विद्यमान संचालक श्री.निलेश पथाजी देवकर व त्यांच्या सुविद्यपत्नी सौ. सोनलताई देवकर या उभयतांच्या शुभहस्ते झाला.अध्यक्षस्थानी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे होते.त्याप्रसंगी ते बोलत होते.प्रारंभी कारखान्याचे उपाध्यक्ष मनेष गाडे व सर्व संचालकांनी उपस्थितांचे स्वागत केले.

जाहिरात
            कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. बाजीराव जी. सुतार प्रास्तविक करतांना म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी ग्रामीण भागात साखर कारखानदारीच्या माध्यमांतुन विकासाची झेप घेतली. युवा अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे सतत आधुनिकीकरणाचा ध्यास घेत शेतकरी सभासदांबरोबरच सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या प्रगतीत भर घालत आहे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली कारखान्याच्या ३ MW टर्बाईनचे आधुनिकीकरण करत ऑफ सिझनमध्येही त्यातुन सहवीज निर्माती करण्यांवर भर देत आहे.

जाहिरात
यावेळी विवेकभैय्या कोल्हे म्हणाले की, बदलत्या मुक्त अर्थव्यवस्थेत सहकारी साखर कारखानदारीसमोर अनेक आव्हाने आहेत त्याचा सामना करण्यासाठी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांचे सुयोग्य मार्गदर्शन मिळत आहे. औद्योगिकीकरणांसाठी लागणा-या पाण्यांचे दर जास्त वाढविल्याने सहकारी साखर कारखानदारीसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले त्याबाबत मंत्री समितीच्या बैठकीत राज्य सहकारी साखर संघाच्या माध्यमांतुन निवेदन केले त्यावर शासनाने इथेनॉल प्रक्रिया साठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचे दर कमी करण्यांचे आश्वासन दिले आहे.

जाहिरात मुक्त
          केंद्र शासनाने इथेनॉलबाबत शाश्वत धोरण घ्यावे म्हणजे चालु हंगामात त्याचा सहकारी साखर कारखानदारीला फायदा होईल. सहकारात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांने अनेक नव नविन प्रकल्प सुरू ठेवत विविध उपपदार्थांची निर्मीती केली व देशातील साखर उद्योगाला दिशा दिली. पाण्यांच्या प्रश्नांमुळे साखर कारखानदारीसमोर शाश्वत उस उपलब्ध होत नसल्याने हा उद्योग अल्पकाळ चालतो त्यातुन सर्वाधिक मोठा ऑफ सिझन राहतो त्यामुळे कामगाराबरोबरच अन्य अनेक प्रश्न निर्माण होवुन आर्थीक आव्हाने उभी राहतात त्याच्या सोडवणुकीसाठी केंद्र व राज्य शासनांने साखर कारखानदारीच्या माध्यमांतुन फुड प्रोसेसिंग युनीटस् सुरू करून त्यासाठी भरीव आर्थीक पाठबळ द्यावे म्हणजे त्याचा परिसरातील शेतक-याबरोबरच त्यावर अवलंबुन असणा-या सर्वच घटकांना फायदा होईल.
          येत्या काळात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना भुशापासुन विटा, त्याबरोबरच टॉमेटो, सोयाबीन पासुन उपपदार्थ बनविणार असुन त्यादृष्टीने कारखान्यांचे सभासद शेतक-यांच्या सहकार्याने पाउल टाकत साखर उद्योग सिझनल न राहता बारमाही उद्योग म्हणुन चालविण्यांसाठी पुढाकार घेत आहे.
           ऊस उत्पादक शेतकरी सभासदांनी कारखान्याला उसाचे बाबतीत स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्यक्षेत्रातच जास्तीचा उस उपलब्ध व्हावा यासाठी उसाच्या आडसाली, पूर्व हंगामी, सुरू लागवडी वाढवाव्यात, तसेच उसाचे खोडवे ठेवुन त्याचे योग्य व्यवस्थापनही करावे असे आवाहन शेवटी विवेकभैय्या कोल्हे यांनी केले.  उपाध्यक्ष मनेष गाडे यांनी आभार मानले.
           याप्रसंगी इथेनॉल व बायोफयुएल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या संचालकपदी युवानेते विवेक भैय्या कोल्हे यांची निवड झाल्याबददल संचालकांच्यावतीने  त्यांचा सत्कार करण्यांत आला तर संचालक बाळासाहेब वक्ते व बाळासाहेब पानगव्हाणे यांचा वाढदिवसानिमीत्त सत्कार करण्यांत आला.
          या कार्यक्रमांस ज्येष्ठ शेतीतज्ञ दत्तात्रय कोल्हे,सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सर्वश्री विश्वासराव महाले, ज्ञानेश्वर परजणे,अरूण येवले,मोहनराव वाबळे, निवृत्ती कोळपे,संजय होन, शिवाजीराव वक्ते, शिवाजीराव बारहाते, पांडुरंग शास्त्री शिंदे, बापूसाहेब बारहाते, बाळासाहेब वक्ते, रमेश आभाळे, ज्ञानदेव औताडे, आप्पासाहेब दवंगे, राजेंद्र कोळपे, ज्ञानेश्वर होन, रमेश घोडेराव, विलासराव वाबळे, विलासराव माळी, त्रंबकराव सरोदे, सौ. उषा संजयराव औताडे, सौ. सोनिया बाळासाहेब पानगव्हाणे,गणेश कारखान्याचे नानासाहेब नळे,बाळासाहेब चोळके,संपत हिंगे,अरविंद फोपसे,आलेश कापसे,अनिल गाढवे,निवृत्ती बनकर,सतिष आव्हाड, कामगार नेते श्री. मनोहर शिंदे, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे, रामनाथ चिने, रिपाईचे दिपक गायकवाड. बाजीराव मांजरे, संभाजीराव गावंड, प्रदिप नवले, डॉ. गुलाबराव वरकड, रामचंद्र भिंगारे, कैलास माळी, अशोक भाकरे, वाल्मीक भास्कर, चंद्रभान रोहोम, कैलास राहणे, कानिफ गुंजाळ, उत्तमराव चरमळ, यादवराव संवत्सरकर, प्रभाकर ससाणे, यांच्यासह संजीवनी उद्योग समुहातील विविध संस्थांचे आजी माजी संचालक, उस उत्पादक शेतकरी, सभासद, खातेप्रमुख उपखातेप्रमुख, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे