महाविकास आघाडी कडून ठाकरे गटाचे निष्ठावंत झावरे यांना कोपरगावातून उमेदवारीचे संकेत?
महाविकास आघाडी कडून ठाकरे गटाचे निष्ठावंत झावरे यांना कोपरगावातून उमेदवारीचे संकेत?
महाविकास आघाडी कडून ठाकरे गटाचे निष्ठावंत झावरे यांना कोपरगावातून उमेदवारीचे संकेत?
कोपरगाव विजय कापसे दि २३ ऑक्टोबर २०२४– राज्यात बहुचर्चित असलेल्या कोपरगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून महाविकास आघाडी कडून सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेकभैय्या कोल्हे हे ठाकरे किंवा शरद पवार गटाकडून निवडणूक लढवणार या चर्चेला संपूर्ण जिल्ह्यात उधाण आले होते.मतदार संघातील कार्यकर्त्यांनी कामाला सुरुवात केली होती परंतु ऐन आचारसंहिता लागताच कोल्हे परिवाराने कोपरगाव विधानसभेच्या प्रत्यक्ष निवडणुकीतून अचानकपणे माघार? (अधिकृत घोषणा करणे बाकी) घेतल्याने संपूर्ण कोपरगाव मतदार संघात राजकीय शांतता पसरली आहे.
त्यामुळे आता महायुतीचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांच्या विरोधात महाविकास आघाडी कडून कोणाला उमेदवारी मिळते ही चर्चा संपूर्ण मतदारसंघात सुरू असुन दोन दिवसापूर्वीच शिवसेना ठाकरे गटाचे निष्ठावंत शिवसैनिक राजेंद्र झावरे यांनी थेट मातोश्री गाठत वरिष्ठांच्या भेटीगाठी घेत उमेदवारीसाठी फिल्डिंग लावल्याने मतदार संघात चर्चेला उधाण आले आहे.
राजेंद्र झावरे हे कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष असून त्यांनी २००१ ते २००६ या त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात कोपरगाव शहराच्या विकासाच्या दृष्टीने केलेली कामे आजही उल्लेखनीय आहे.ठाकरे गटाचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांची संपूर्ण राज्यभर एक वेगळीच ओळख असून त्यांनी शिवसेना ठाकरे गटात अनेक संघटनात्मक पदे भूषवित जिल्ह्यात संघटना मोठी करण्यासाठी प्रयत्न केले आहे. त्यामुळे कोपरगाव विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडी ठाकरे शिवसेनेला सुटण्याची शक्यता असल्याने त्यांचा या कामाची पावती म्हणून ठाकरे गटाकडून निष्ठावंत शिवसैनिक म्हणून कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता राजकीय अभ्यासकाकडून वर्तविली जात आहे. कोपरगाव शहरासह संपूर्ण तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाला मानणारा सर्वात मोठा मतदार वर्ग असल्याने निष्ठावंत शिवसैनिक म्हणून झावरे यांना या मताचा फायदा होऊ शकतो?