गोदामाई चे आदिनाथ ढाकणे यांचा वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा
गोदामाई चे आदिनाथ ढाकणे यांचा वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा
गोदामाई चे आदिनाथ ढाकणे यांचा वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा
कोपरगाव विजय कापसे दि २३ ऑक्टोबर २०२४– कोपरगाव नगरपालिकेचे स्वच्छता दूत तथा गेल्या अनेक वर्षांपासून कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या पवित्र अशा गोदावरी नदीची आपल्या गोदामाई प्रतिष्ठान तर्फे अविरतपणे स्वच्छता करत असलेले गोदामाई सेवक आदिनाथ ढाकणे यांचा २० ऑक्टोबर रोजी असलेला वाढदिवस गोदामाई प्रतिष्ठान च्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व अल्पोपहाराचे वाटप करत अनोख्या पध्दतीने साजरा करण्यात आला.
गोदामाई सेवकांनी सोमवार दि २१ ऑक्टोबर रोजी रोजी सकाळी ठीक अकरा वाजताकोपरगाव नगरपालिकेच्या बेट भागातील शाळा क्रमांक ५ मधील इयत्ता पहिली ते सातवी मध्ये शिकणाऱ्या गरीब , होतकरू, वीट भट्टीवरकाम करणाऱ्या, मोलमजुरी करणाऱ्यांच्या मुलांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप केले तसेच शाळेमध्ये सामाजिक विषयांवर निबंध स्पर्धा घेत या स्पर्धेमध्ये पाचवी ते सातवी गटामधील प्रथम तीन विद्यार्थ्यांना, द्वितीय तीन विद्यार्थ्यांना, व तृतीय तीन विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, कंपास बॉक्स, स्केचपेन बॉक्स, पेन, चित्रकला वही आदी साहित्याचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते देण्यात आले.
या प्रसंगी कमलाताई बाळासाहेब सातभाई तांत्रिक ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक जनार्दन सुपेकर तसेच सेवानिवृत्त प्राध्यापिका शीला गाडे, नगरपालिका शाळा क्रमांक पाचचे ज्येष्ठ शिक्षक सुनील रहाणे,परम सद्गुरू शुक्राचार्य मंदिर उपप्रमुख प्रसाद पऱ्हे, शाळेचे मुख्याध्यापक विलास माळी, अमोल कडू, गोदामाई प्रतिष्ठानचे वैष्णवी ढाकणे, प्रज्वल ढाकणे, विशाल पंडोरे , ऋतुराज आहेर, अभिषेक कोल्हे, आप्पा नवले आदीं उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील रहाणे यांनी तर आभार नसरीन इनामदार यांनी केले.