संजीवनी महिला बचत गटाच्या महिला भगिनींचे फराळ विक्री केंद्र सुरू
संजीवनी महिला बचत गटाच्या महिला भगिनींचे फराळ विक्री केंद्र सुरू
कोपरगाव विजय कापसे दि २६ ऑक्टोबर २०२४- दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार २५ ऑक्टोबर रोजी संजीवनी स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या अध्यक्ष रेणुकाताई विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते संजीवनी महिला बचत गट फराळ विक्री केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.दीपावलीचा उत्सवाला रुचकर फराळाची मेजवानी करण्यासाठी बचत गटाच्या महिला भगिनींनी अतिशय स्वच्छता,दर्जेदार तेल आणि साहित्य वापरून बनविलेले पदार्थ खरेदी करण्यासाठी नागरिकांना या केंद्राचा लाभ होणार आहे.महिला भगिनींना प्रोत्साहन देऊन संजीवनी बचत गटांनी हा स्तुत्य उपक्रम राबविला आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक महिला बचत गटाच्या महिलांनी गृह उद्योगाच्या माध्यमातून बनवलेले दिवाळी फराळ विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळावी या उद्देशाने रेणुका कोल्हे यांनी विशेष लक्ष देऊन या केंद्राची उभारणी केली.स्नेहलताताई कोल्हे व रेणुकाताई कोल्हे यांनी हजारो बचत गटांचे जाळे निर्माण केले असून त्या माध्यमातून महिलांमध्ये आर्थिक सक्षमता घडून येते आहे.युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांचे मार्गदर्शन या स्तुत्य उपक्रमासाठी आहे.स्थानिक महिला भगिनींनी तयार केलेले रुचकर पदार्थ मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ असणाऱ्या केंद्रात खरेदी करता येणार आहे.
महिला बचत गटांनी विवीध गृहउद्योगांच्या माध्यमातून आपला ठसा उमटविला आहे.विश्वासार्ह उत्पादने हा महत्वाचा उद्देश यात जपला जातो.या उपक्रमाच्या अंतर्गत अनेक महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे.फराळ विक्री केंद्र हे एक माध्यम असून यातून आपल्याच परिसरातील महिला भगिनींनी एकत्र येऊन साकारलेले ऐक्य सर्वांसाठी मार्गदर्शक ठरते. कोल्हे कुटुंब नेहमीच अशा स्तुत्य उपक्रमाना पाठबळ देण्याचे काम करत आला आहे व पुढेही सुरू असेल असे यावेळी सौ.कोल्हे म्हणाल्या.
मोनिका संधान,अनिता वरकड,संगीता धट,प्रीती ठोळे ,मंजुषाताई गोयल, निता मुंदडा,नेहा गुजराथी,सविता सोनवणे,अनिता मुरकुटे,सुरेखा आवारे,सविता राजपूत आदींसह महिला भगिनींच्या उपस्थितीत या फराळ विक्री केंद्राची सुरुवात झाली.