कोल्हे गटविवेक कोल्हे
श्री गणेश कारखान्याच्या इतिहासात सर्वोच्च भावाचा सभासदांना दिलेला शब्द पूर्ण केला – विवेकभैय्या कोल्हे
श्री गणेश कारखान्याच्या इतिहासात सर्वोच्च भावाचा सभासदांना दिलेला शब्द पूर्ण केला – विवेकभैय्या कोल्हे
संजीवनी,संगमनेरच्या बरोबरीने गणेशची घोडदौड – विवेकभैय्या कोल्हे
गणेशनगर विजय कापसे दि २७ ऑक्टोबर २०२४– श्री गणेश सहकारी साखर कारखाना मागील पहिलाच हंगाम अतिशय प्रतिकूल परिस्थिती यशस्वी केला.२०२३-२४ या गळीत हंगामात ऊस उपलब्धता अतिशय कमी असल्याने कारखाना चालविणे आणि मागील काळातील थकित देणे देण्यासाठी मोठी आर्थिक कसरत कोल्हे – थोरात या सहकार युतीच्या ताब्यात कारखाना आल्यानंतर नवीन संचालक मंडळाला करावी लागली होती,त्यानंतर मागील अनेक देनी संचालक मंडळाने अदा केली.आजतागायत २८०० रुपये एवढा उसाचा दर आपण अदा केलेला आहे. संजीवनी ,संगमनेरच्या बरोबरीने गणेशला भाव देऊ हा दिलेला शब्द पाळत पुरवणी दर २०० प्रमाणे आज देण्याचा निर्णय पूर्वनियोजनाप्रमाने झालेला आहे.गणेश कारखाना इतिहासात प्रतिकूल काळात देखील उच्चांकी दर देऊन शेतकरी सभासद यांचा विश्वास जपला असल्याची प्रतिक्रिया सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखाना अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी दिली आहे.
कर्मचाऱ्यांचे पगार आणि रिटेंशनची प्रलंबित रक्कम वर्ग करण्यात येणार आहे.यामुळे सभासद,कर्मचारी आणि बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे. कामगारांना मिळणारे सानुग्रह अनुदान(बोनस) हा कायमस्वरूपी ८.३३% पूर्वी मिळत होता त्यात प्रथमच गतवर्षी आर्थिक अडचण असताना कारखान्याने कर्मचारी हित पाहून ९% अदा केला होता.यावर्षी देखील १०% बोनस अदा करणार आहे.प्रामुख्याने गणेश परिसर आणि पर्यायाने राहता तालुक्याची बाजारपेठ फुलण्यासाठी ऊसदराचा हा निर्णय ऐतिहासिक ठरणारा आहे.तांत्रिक आणि आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी गणेश कारखाना पावले टाकत आहे त्यात साथ देणारे सभासद आणि कर्मचारी बांधव यांची दिवाळी गोड करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे विवेकभैय्या कोल्हे म्हणाले.
जुलै २०२३ मद्ये आ.बाळासाहेब थोरात आणि युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी गणेश कारखाना ताब्यात घेतला होता.त्यापूर्वी भाडेतत्त्वावर असल्याने कारखाना आर्थिक अडचणीत होता.जुलै २०२३ पूर्वीचे तीन पगार,एक रीटेन्शन आणि फरकाची रक्कम तत्कालीन संचालक मंडळाकडून थकली होती.यातून मार्ग काढून कारखाना सुरू केला.ऊस उपलब्धता कमी व आर्थिक अडचण असल्याने २ लाख १७ हजार मेट्रिक टन गाळप होऊ शकले.यासाठी संजीवनीने सहकार्य करून मोठ्या प्रमाणात ऊस पुरविला.२ लाख ४३ हजार ८०० पोते साखर निर्मिती झाली.११.२० एवढी नगर जिल्ह्यात सर्वाधिक रिकव्हरी सहकारी कारखान्याच्या तुलनेत गणेशची झाली. बगॅस बचत होऊन इतिहासात सर्वप्रथम त्याची विक्री करता आली.यावेळी साधारण २७०० मे. ट प्रतिदिन क्षमतेने चालवण्याचे उद्दिष्ट चेअरमन सुधीर लहारे,व्हा.चेअरमन विजय दंडवते आणि सर्व संचालक मंडळाने ठेवलेले आहे.
सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाचे शब्द पाळून आम्ही ऋण जपले आहे.अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून श्री गणेश कारखाना घोडदौड करण्यात आम्ही प्रयत्नशील आहोत.सहकारी संस्था या ग्रामीण जीवनाची अर्थवाहिनी आहेत.आपल्या माध्यमातून शेतकरी सभासद बांधवांच्या जीवनात बदल घडण्यासाठी हा कारखाना जोमाने चालविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहोत असेही शेवटी कोल्हे म्हणाले.