काळे गट

आमदार काळे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील- कारभारी आगवन

आमदार काळे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील- कारभारी आगवन

करंजी गावात चैताली काळे यांची प्रचार रॅलीला मोठा प्रतिसाद 

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १० नोव्हेंबर २०२४कोपरगाव विधानसभेचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आशुतोष काळे हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते कारभारी आगवन यांनी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार गटाचे) अधिकृत उमेदवार आशुतोष अशोकराव काळे यांच्या प्रचार मोहिमेचा शुभारंभ अहमदनगर जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैतालीताई काळे यांच्या शुभहस्ते पूर्व भागातील करंजी येथील हनुमान मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला या प्रसंगी आगवन बोलत होते.

जाहिरात

या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्या विमल आगवन, गौतम सहकारी बँकेचे चेअरमन संजय आगवन, चांगदेव आगवण, कोल्हे गटाचे नवनाथ आगवण, देविदास भिंगारे, गोरख भिंगारे, वाल्मीक भिंगारे, मच्छिंद्र भिंगारे, रावसाहेब भिंगारे, सांडूभाई पठाण, मुकुंद आगवन, बाबासाहेब आगवन, गोपाळ कुलकर्णी, भिकन शहाणे, सुनील आगवन, नारायण आगवन, विकास शिंदे, बाबासाहेब कापसे, केशव चरमळ, रघु कापसे, दत्तात्रय शिंदे, उत्तम गायकवाड, संतोष आगवन, राजेंद्र आगवन, दादू आगवन,उत्तम शिंदे,रामेश्वर शिंदे,रोहित शेळके,ज्ञानेश्वर आगवन,संदीप ढवळे,गोरक्षनाथ शिंदे,नंदू आगवन,संजय फापाळे, रवी गायकवाड आदींसह मोठ्या संख्येने काळे व कोल्हे गटाचे कार्यकर्ते, विविध संस्थेचे पदाधिकारी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

जाहिरात

या प्रसंगी कारभारी आगवन यांनी पुढे बोलताना सांगितले की, आमदार काळे यांनी मागील पंचवार्षिक मध्ये कोपरगाव मतदार संघाचा सर्वांगीण विकास केला असून सर्व घटकांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यावर भर दिला आहे तर विशेषता कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील पूर्व भागाला देखील भरघोस निधी दिला असून यात संजीवनी कारखाना ते नऊचारी रस्ता, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वर्ग खोल्या बांधकाम करणे व दुरुस्ती करणे, मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत साठवण बंधरा बांधणे, करंजी ते बोकटा रस्ता खडीकरण व डांबरीकरण, आंचलगाव ते करंजी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण, मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत साठवून बंधरा, करंजी येथील चांगदेव माळवे घर ते रामभाऊ शिंदे वस्ती रस्ता खडीकरण, करंजी ते शिंगणापूर रस्त्यावर उंबरानाला सीडी वर्क दुरुस्ती, कब्रस्तान संरक्षण भिंत, स्मशानभूमीचा विकास, आगवन काटवण वस्तीत १०० केव्ही ट्रान्सफर फार्मर बसवणे, शिंदे मळा रस्ता काँक्रिटीकरण, म्हसोबा मंदिर ते जुना कॅनल पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे आदी विकास कामे पूर्ण केली आहेत तर करंजी ते ओगदी रस्ता, येसगाव खिर्डी बोलकी रस्ता मजबुतीकरण डांबरीकरण करणे, पाणीपुरवठा योजना करणे, करंजी फाटा ते पढेगाव कॅनल रस्ता करणे, संजीवनी ते नऊचारी रस्ता डांबरीकरण करणे, करंजी ते पढेगाव कॅनॉल पर्यंत रस्ता डांबरीकरण व मजबुतीकरण करणे, पढेगाव कॅनॉल ते दहेगाव बोलका रस्ता डांबरीकरण मजबुतीकरण करणे, मृदा व जलसंधारण अंतर्गत नाला खोलीकरण करणे, तलाठी कार्यालय बांधणे, म्हसोबा मंदिर ते जुना कॅनॉल पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे, पढेगाव ओगदी रोड ते चरमळ वस्ती रस्ता करणे, कब्रस्तान संरक्षण भिंत बांधणे तसेच करंजी येथील गावठाणला वीजपुरवठा करणे ही कामे प्रगतीपथावर आहे यामुळे नक्कीच उच्च विद्याविभूषित, शांत, संयमी, कार्यसम्राट आमदार आशुतोष काळे यांचा नक्कीच मोठ्या मताधिक्याने विजय होईल असा विश्वास कारभारी आगवन यांनी बोलताना व्यक्त केला.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे