निवडणूक कामकाजाबाबत उमेदवारांना वेळोवेळी माहिती द्यावी – निवडणूक निर्णय अधिकारी कविथा रामू
निवडणूक कामकाजाबाबत उमेदवारांना वेळोवेळी माहिती द्यावी – निवडणूक निर्णय अधिकारी कविथा रामू
निवडणूक कामकाजाबाबत उमेदवारांना वेळोवेळी माहिती द्यावी – निवडणूक निर्णय अधिकारी कविथा रामू
शिर्डी विजय कापसे दि १० नोव्हेंबर २०२४:- विधानसभा निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यात पारदर्शकता जपत उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना निवडणूक कामकाजाबाबत वेळोवेळी माहिती देण्यात यावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी कविथा रामू यांनी दिले.
शिर्डी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत त्या बोलत होत्या. याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल मोरे, नगरपालिका मुख्याधिकारी वैभव लोंढे, नायब तहसीलदार मनोज भोसेकर, बाळासाहेब मुळे आदी उपस्थित होते.
श्रीमती रामू म्हणाल्या, उमेदवारांनी प्रचार करताना सर्व बाबींची परवानगी घेऊनच त्यावर अंमल करावा, आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, निवडणुका निकोप व पारदर्शक वातावरणात होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी आदर्श आचारसंहिता, निवडणूक खर्च मर्यादा, विविध परवानग्यांसाठी एक खिडकी कक्ष, प्रचार साहित्य छपाई बाबत आयोगाच्या सूचना, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांनी प्रकाशित करावयाची माहिती आदी विषयांवर निवडणूक निर्णय अधिकारी आहेर यांनी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन केले.
यावेळी आचारसंहिता कक्षामार्फत देण्यात आलेल्या विविध परवानग्या, टपाली मतदान, गृह मतदान, मतदानाच्या दिवशीची तयारी, मतदान साहित्य वाटप, संवेदनशील मतदान केंद्रे आणि तेथील पोलीस बंदोबस्त याविषयी निवडणूक निर्णय अधिकारी आहेर यांनी निवडणूक निरीक्षक श्रीमती रामू यांना माहिती दिली.