समता पतसंस्था

देशातील सहकार चळवळीने समताचा आदर्श घ्यावा – खासदार शरदचंद्र पवार

देशातील सहकार चळवळीने समताचा आदर्श घ्यावा – खासदार शरदचंद्र पवार
समता पतसंस्थेस सदिच्छा भेट
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १३ नोव्हेंबर २०२४ : भारतातील कर्नाटक, केरळ, गुजरात या राज्यात सहकारी पतसंस्था चळवळ अग्रेसर आहे. महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था चळवळ ही इतर राज्यांपेक्षाही सक्षम असून महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीचे नेतृत्व कोपरगावचे काका कोयटे यांच्याकडे असल्यामुळे शक्य झाले आहे. याचा कोपरगावकरांना अभिमान वाटला पाहिजे. तसेच काका कोयटे यांच्या समता पतसंस्थेतील नाविन्यपूर्ण अत्याधुनिक तंत्रज्ञानाबाबत ऐकत होतो. प्रत्यक्षात समता पतसंस्थेला भेट देऊन ते अनुभवले. समता पतसंस्थेचे नावीन्यपूर्ण अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आदर्श देशातील सहकारी चळवळीने घ्यावा.असे गौरवोद्गार सहकाराचे जनक मा. शरदचंद्रजी पवार यांनी काढले.

जाहिरात
    कोपरगाव मतदार संघातील विधानसभा निवडणुकीचे उमेदवार संदीप वर्पे यांच्या प्रचारासाठी मा.शरदचंद्रजी पवार कोपरगाव तालुक्यात आले असता त्यांनी जाणीवपूर्वक काका कोयटे यांचे गाव का ? अशी विचारणा करत स्वतःहून समता पतसंस्थेला भेट दिली असता, महाराष्ट्रातील अग्रगण्य समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या भव्य इमारतीचे ‘सहकार मंदिर’ असे नामकरण मा.शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

जाहिरात
    अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना काका कोयटे म्हणाले की, समता पतसंस्थेला सहकाराचे जनक मा. शरदचंद्रजी पवार यांनी स्वतःहून भेट दिल्याबद्दल समता परिवार धन्य झाला. आम्ही गेल्या काही महिन्यात १ हजार कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार करणार आहोत. समताचे अत्याधुनिक तंत्रज्ञान व ग्राहक सेवा बाबत महाराष्ट्रात असलेल्या नावलौकिकामुळे संस्थेचे भव्य मुख्य कार्यालय हे ‘सहकार मंदिर’ या नावाने ओळखले जावे ही इच्छा होती. ती इच्छा मुख्य कार्यालयाला ‘सहकार मंदिर’ असे नाव देऊन पूर्ण झाली आहे.
     या नामकरण सोहळ्याचे प्रास्ताविक समता पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी केले. या वेळी संदीप वर्पे, समता पतसंस्थेचे संचालक जितूभाई शहा, अरविंद पटेल, गुलशन होडे, किरण शिरोडे, व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा, खजिनदार तुलसीदास खुबाणी, सचिव प्रदीप साखरे, उद्योगपती मनोज अग्रवाल, राजेश ठोळे, अजित लोहाडे, प्रकाश शिरोडे, अरविंद भन्साळी, मुख्य कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार जनरल मॅनेजर सचिन भट्टड यांनी मानले.

oplus_0

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे