आपला जिल्हा

आ. आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून कोपरगाव शहरात १३ ठिकाणी हायमॅक्सचा झगझगाट

आ. आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून कोपरगाव शहरात १३ ठिकाणी हायमॅक्सचा झगझगाट
सणासुदीच्या काळात शहर होणार प्रकाशमय;
अंधारामुळे होणाऱ्या गैरसोयींसह सुरक्षिततेचा प्रश्नही सुटणार
जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २ सप्टेंबर २०२६ :- कोपरगाव शहरातील नागरी सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या माध्यमातून विविध विकासकामांना गती देण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील १३ महत्त्वाच्या ठिकाणी हायमॅक्स दिवे बसविण्याचे काम हाती घेण्यात आले असून, अनेक ठिकाणी हे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ठिकाणचे कामही प्रगतीपथावर असल्याने ऐन सणासुदीच्या काळात कोपरगाव शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि सार्वजनिक परिसर प्रकाशमय होणार आहेत.

जाहिरात

कोपरगाव शहरातील अनेक भागांमध्ये पुरेशा प्रकाशव्यवस्थेचा अभाव असल्याने नागरिकांना रात्रीच्या वेळी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. विशेषतः मोकाट जनावरांचा वाढता उपद्रव, अंधारामुळे होणारे अपघात, महिला, मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तसेच रात्रीच्या वेळी असामाजिक कृत्यांना मिळणारा वाव, या पार्श्वभूमीवर शहरात हायमॅक्स दिव्यांची आवश्यकता निर्माण झाली होती.

जाहिरात

शहरातील मोकाट जनावरांच्या प्रश्नामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असतानाच रात्रीच्या अंधारात मोकाट जनावरांमुळे लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना धोका निर्माण होत आहे. तसेच सण-उत्सव आणि विविध सार्वजनिक कार्यक्रमांच्या काळात नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे शहरातील प्रमुख ठिकाणी सक्षम प्रकाशव्यवस्था असणे गरजेचे होते. ही गरज लक्षात घेऊन आ. आशुतोष काळे यांनी महायुती शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून हायमॅक्स दिव्यांसाठी निधी उपलब्ध करून घेतला.या निधीतून शहरातील ओमनगर, साईसिटी, भामानगर येथील गणपती मंदिर परिसर, कोजागिरी कॉलनी, घनकचरा व्यवस्थापन डेपो आणि साठवण तलाव क्रमांक ५ या ठिकाणी हायमॅक्स दिवे बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे.

जाहिरात

तर अहिंसा स्तंभ परिसर, दत्तनगर येथील दत्तमंदिर परिसर, गवारेनगर-गवारे वस्ती, ब्रिजलाल नगर यासह शहरातील एकूण १३ ठिकाणी हायमॅक्स दिवे बसविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील अंधाराचे साम्राज्य दूर होऊन प्रमुख रस्ते व सार्वजनिक ठिकाणे रात्रीच्या वेळीही उजळून निघणार आहेत. सणासुदीच्या तोंडावर शहरातील विविध भागांमध्ये प्रकाशव्यवस्था उपलब्ध होत असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. हायमॅक्स दिव्यांमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडण्याबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेतही वाढ होणार असल्याने नागरिकांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहेत.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे