आपला जिल्हा
टाकळीची प्रतीक्षा एमपीएससी मधून बनली वर्ग १ राजपत्रित अधिकारी
टाकळीची प्रतीक्षा एमपीएससी मधून बनली वर्ग १ राजपत्रित अधिकारी

कोपरगाव विजय कापसे दि १४ मे २०२५– कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील कन्या प्रतिक्षा बाळासाहेब देवकर हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा मधून संपूर्ण राज्यातून ४२ वा आणि महिलांमधून १० वा क्रमांक मिळविला असून प्रतिक्षा देवकर हिची सहाय्यक कार्यकारी अभियंता ( वर्ग १ राजपत्रित अधिकारी ) या पदावर निवड झाल्याने टाकळी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून याचे औचित्य साधत सोमवार दि १२ मे रोजी टाकळी ग्रामस्थांच्या वतीने प्रतीक्षाचा नागरी सत्कार केला.






