शहर पोलिस कोपरगाव

डायल ११२ चा गौरवापर;कोपरगांव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

डायल ११२ चा गौरवापर;कोपरगांव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
डायल ११२ चा गौरवापर;कोपरगांव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जाहिरात देवकर

कोपरगाव विजय कापसे दि २८ नोव्हेंबर २०२४–  कोपरगांव शहर पोलीस स्टेशनचे डायल ११२ मंगळवार दि २६ नोव्हेंबर रोजी ४.१८  वाजता कॉल आला व त्यावर  हनुमाननगर गेट कोपरगांव या ठिकाणी भावाचा काल खुन झाला असुन, त्याचा मृतदेह सापडत नाही तरी तात्काळ पोलीस मदत पाठवा असा कॉलरने कॉल केल्याने सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक  भगवान मधुरे यांनी तात्काळ सपोनि  आशिष शेळके, पो. कॉ चोंगडे, पो. कॉ साळुंखे यांना सदर ठिकाणी खात्री करण्यासाठी रवाना केले. त्यांनी सदर ठिकाणी जावुन कॉलरचे मोबाईल नंबरवर संपर्क केला असता कॉलर याने पोलीसांना काही एक प्रतिसाद दिला नाही. तेव्हा पोलीसांनी तेथील स्थानिक नागरीकांकडे विचारपुस केली असता सदर ठिकाणी कोणताही खुन झालेला नसल्याचे सांगितले.

जाहिरात पहाडे
त्यानंतर पोलिसांनी कॉलरच्या मोबाईल नंबरवर वारंवार संपर्क करून त्याची भेट घेवुन त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव परशराम रावसाहेब दिवे राहणार हनुमाननगर अस सांगितले. त्यावेळी त्याचेकडे घटनेबाबत सविस्तर विचारपुस केली असता कॉलरने सांगितले की, त्याचा मोठा सावत्र भाऊ संतोष आढांगळे याचा पहाटे ३ वा. खुन झालेला आहे आणि त्याचा मृतदेह हा तेथेच राहणारा माउ पवार याने गोणीत घालुन घेवुन जातांना मी पाहिले आहे असे सांगितले.

जाहिरात लकारे
त्यानंतर पोलीसांनी कॉलरची पत्नी रत्नमाला परशुराम दिवे यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी कॉलरचा सावत्र भाउ संतोष आढांगळे यांचा मोबाईल नंबर घेत त्यावर संपर्क केला असता त्याने सांगितले की, मी जिवंत असुन सुस्थितीत आहे. त्यामुळे पोलीसांची खात्री झाली की, कॉलर परशराम रावसाहेब दिवे याने कोणतीही खुनासारखी घटना घडलेली नसतांना पोलीसांना त्रास व्हावा या खोडसाळ वृत्तीने डायल ११२ यावर कॉल करुन खोटी माहिती दिली. म्हणुन आरोपी  परशराम रावसाहेब दिवे याचे विरूध्द कोपरगांव शहर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोनि भगवान मधुरे यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकों बबन तमनर हे करीत आहेत.

जाहिरात लहिरे
महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरीकांना आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ पोलीस सेवा किंवा मदत एकाच टोल फ्री क्रमांकावर मिळावी म्हणून डायल ११२ सुविधा सुरू करण्यात आलेली आहे.
तरी तक्रार सत्य व खरी असल्याशिवाय डायल ११२ हा नंबर डायल करू नये. तसेच डायल ११२ वर खोटी माहिती देवु नये. खोटी माहिती देणा-या विरुध्द गुन्हे दाखल करण्यात येतील याची सर्वांनी नोंद घ्यावी.
भगवान मथुरे
कोपरगाव शहर पोलिस निरीक्षक

जाहिरात निखाडे
जाहिरात जगताप
जाहिरात म्हस्के
जाहिरात जोशी

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे