उक्कडगावच्या शिवबालक मंदिर शाळेचा शंभर टक्के निकाल
उक्कडगावच्या शिवबालक मंदिर शाळेचा शंभर टक्के निकाल
उक्कडगावच्या शिवबालक मंदिर शाळेचा शंभर टक्के निकाल

कोपरगाव विजय कापसे दि २७ मे २०२४– महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १० च्या परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला असून यात कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील उक्कडगाव येथील शिव बालक मंदिर या शाळेच्या पहिल्या बॅचचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

शिवबालक मंदिर शाळेचे इयत्ता दहावीच्या वर्गात प्रथम क्रमांक नंदिनी त्रिभुवन ( ८४%) द्वितीय क्रमांक श्रुती देवकर (८२.४०%) तर तृतीय क्रमांक विशाल देवकर (८२%) टक्के मार्क मिळवत यशस्वी झाले आहे.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी लावरे, मुख्याध्यापक देशमुख यांच्यासह शालेय शिक्षक एस.बी जाधव, बी.बी पिंपळे, व्ही.बी पगारे, एम.बी वारकर, एस.बी सोनवणे, डी. एस भुजाडे, पी.एस लावरे आदि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह आजी-माजी विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.




