आपला जिल्हा

कोपरगावमध्ये नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा; राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक विरेन बोरावके यांची मागणी

कोपरगावमध्ये नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा; राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक विरेन बोरावके यांची मागणी

कोपरगावमध्ये नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा; राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक विरेन बोरावके यांची मागणी

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ३१ डिसेंबर २०२५मकर संक्रांती काही दिवसांवर आला असून कोपरगाव शहरात नागरिकांची खरेदीची लगबग चालू असल्याने बाजारपेठ फुललेली असताना काल (दि ३०) रोजी नायलॉन मांजामुळे एक लहान मुलगा आणि दोन पुरुष असे तीन जण जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. आकाशात उडणाऱ्या पतंगा सोबतच नायलॉन मांजाची टांगती तलावर नागरिकांच्या मानेवर असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत संबंधित विक्रेत्यांवर तात्काळ कडक कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक विरेन बोरावके यांनी केली आहे.

जाहिरात

नायलॉन मांजाची खरेदी व विक्री कायद्याने गुन्हा असतानाही कोपरगाव शहर व परिसरात सर्रासपणे नायलॉन मांजा विकला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होत आहे. नायलॉन मांजा अतिशय धारदार व मजबूत असल्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वार, पादचारी तसेच पक्ष्यांना गंभीर इजा होण्याच्या अनेक घटना राज्यभरात घडल्या आहेत. गळ्याला, हाताला किंवा चेहऱ्याला मांजा लागून गंभीर जखमा होण्याचे प्रकार सातत्याने समोर येत असून काही ठिकाणी जीवघेण्या घटना देखील घडल्याचे निदर्शनास आले आहे.

जाहिरात

विरेन बोरावके यांनी सांगितले की, नायलॉन मांजा वापरणे, साठवणे तसेच विक्री करणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. तरीही काही विक्रेते नियम धाब्यावर बसवून नायलॉन मांजा विकत आहेत. याचा थेट फटका निष्पाप नागरिकांना बसत आहे. आपल्या आनंदामुळे कुणाचे घर उधवस्त होऊ नये, मकर संक्रांतीचा सण सगळ्यांसाठी आनंदाचा क्षण आहे. नागरिकांनी हि सामाजिक जाणीव ठेवत नायलॉन मांजाचा वापर शंभर टक्के टाळायचा आहे. कोपरगाव नगरपरिषद, पोलीस प्रशासन यांनी संयुक्त मोहीम राबवून शहरातील दुकाने, फेरीवाल्यांची तपासणी करून मांजा आढळून आल्यास कारवाई करावी.

जाहिरात

कोपरगावच्या नागरिकांनीही जागरूक राहावे, नायलॉन मांजा खरेदी अथवा वापर करू नये तसेच कोठे बेकायदेशीर विक्री सुरू असल्याचे आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, नायलॉन मांजाऐवजी पर्यावरणपूरक व सुरक्षित कागदी किंवा सूती मांजाचा वापर करावा, जेणेकरून मानवासह पक्षी व प्राण्यांचेही संरक्षण होईल असे आवाहन विरेन बोरावके यांनी केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे