आपला जिल्हा

नगराध्यक्ष पराग संधान ऍक्शन मोडवर; कोपरगाव शहराच्या पाणी व्यवस्थापनाची प्रत्यक्ष पाहणी

नगराध्यक्ष पराग संधान ऍक्शन मोडवर; कोपरगाव शहराच्या पाणी व्यवस्थापनाची प्रत्यक्ष पाहणी
नगराध्यक्ष पराग संधान ऍक्शन मोडवर; कोपरगाव शहराच्या पाणी व्यवस्थापनाची प्रत्यक्ष पाहणी
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ३१ डिसेंबर २०२५कोपरगाव शहराला भेडसावत असलेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर लोकनियुक्त नगराध्यक्ष पराग संधान यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वीच ऍक्शन मोडमध्ये येत शहराच्या पाणी व्यवस्थापनाची सखोल पाहणी केली. शहरातील तलाव तसेच जलशुद्धीकरण केंद्राला प्रत्यक्ष भेट देत त्यांनी पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती जाणून घेतली आणि आवश्यक त्या स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

जाहिरात
नागरिकांना पाणीपुरवठ्याबाबत भेडसावणाऱ्या समस्या कशा कमी करता येतील, पाण्याचे नियोजन अधिक प्रभावी कसे करता येईल आणि भविष्यात पाणीटंचाई टाळण्यासाठी कोणती पावले उचलावी लागतील यावर नगराध्यक्ष संधान यांनी विशेष भर दिला. केवळ पाहणीपुरती मर्यादित न राहता, प्रत्यक्ष कृतीतून काम करण्याची दिशा त्यांनी अधिकाऱ्यांना दाखवून दिली.

जाहिरात
युवानेते विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव नगरपरिषदेने स्वच्छता अभियानासह विविध उपक्रमांची प्रभावी सुरुवात केली आहे. त्या कार्याची पुढची पायरी म्हणून नगराध्यक्ष पराग संधान यांनी पाणी व्यवस्थापनासारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर लक्ष केंद्रित करत अपेक्षित कामांना सुरुवात केल्याने शहरवासीयांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे.
या पाहणी दरम्यान नगराध्यक्ष पराग संधान यांच्यासह नगरसेवक वैभव आढाव, गटनेते प्रसाद आढाव, सर्व नगरसेवक श्री. जितेंद्र रणशूर, स्वप्निल मंजुळ, आकाश वाजे, रवींद्र कथले, संजय उदावंत, कैलास मंजुळ, फिरोज पठाण, दत्तात्रय पगारे तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
कोपरगाव नगरपरिषदेच्या तलाव क्रमांक एक ते पाचची सविस्तर पाहणी करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी सुहास जगताप तसेच बांधकाम, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अधिकारीही उपस्थित होते.शहराच्या मूलभूत प्रश्नांवर थेट कृती करत नगराध्यक्ष पराग संधान यांनी प्रशासन अधिक गतिमान करण्याचा निर्धार दाखवून दिला आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे