आपला जिल्हा

लाचलुचपत विभाग पथकाची तहसील कार्यालयातील २ कर्मचाऱ्यांवर व १ खाजगी इसमावर करवाई 

लाचलुचपत विभाग पथकाची तहसील कार्यालयातील २ कर्मचाऱ्यांवर व १ खाजगी इसमावर करवाई 
लाचलुचपत विभाग पथकाची तहसील कार्यालयातील २ कर्मचाऱ्यांवर व १ खाजगी इसमावर करवाई 
कोपरगाव विजय कापसे दि १० डिसेंबर २०२४कोपरगाव शहरात नाशिक येथिल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कोपरगाव तहसील कार्यालयात कार्यरत असलेल्या दोन अधिकारी कर्मचाऱ्यांवर तर एका खाजगी व्यक्तीवर अशा एकूण तिघांवर मोठी करवाई केली असून कोपरगांव शहर पोलीस ठाण्यात या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरा पर्यंत सुरू होते. त्यामुळे सदरच्या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून लाचखोरांचे धाबे दणाणले आहे.

जाहिरात
 याबाबत नाशिक लाचलुतपत विभागाकडून मिळालेली माहिती अशी की, यातील तक्रारदार यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय असून ते सदरील व्यवसायासाठी वापर करीत असलेल्या ट्रॅक्टर वर कारवाई न करण्यासाठी कोपरगाव तहसील कार्यालयातील लिपिक चंद्रकांत नानासाहेब चांडे आणि कारकून योगेश दत्तात्रय पालवे  राहणार कोपरगाव यांनी आरोपी खाजगी इसम नामे प्रतीक कोळपे यांचे मार्फत तक्रारदार यास दरमहा १५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांस लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी तत्काळ लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक येथे तक्रार केली त्यावरून शुक्रवार दिनांक ६ डिसेंबर २०२४ रोजी पंचा समक्ष केलेल्या पडताळणी कारवाईत लिपिक चंद्रकांत चांडे यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचांसमक्ष १५ हजार रुपये लाचेची मागणी केली व मागणी केलेली लाचेची रक्कम खाजगी आरोपी इसम नामे प्रतीक कोळपे याचेकडे देण्यास सांगितले. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रतीक कोळपे यास संपर्क केला असता त्याने लिपिक चांडे यांनी मागणी केलेली लाचेची रक्कम स्वीकारली. त्यानंतर आरोपी पालवे व चांडे यांना फोन द्वारे आरोपी खाजगी इसम प्रतीक कोळपे याने १५ हजार लाचेची रक्कम  स्वीकारले बाबत सांगितले असता चंद्रकांत चांडे व योगेश पालवे यांनी खाजगी इसम प्रतीक कोळपे यास सदर लाचेची रक्कम स्वीकारण्यास संमती दिल्यामुळे तहसील कार्यालयातील २ कर्मचारी व आरोपी खाजगी इसम यांचे विरुध्द कोपरगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७, ७ अ व १२ अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरू होती.

जाहिरात
       सदरची कौतुकास्पद कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस उपअधीक्षक संतोष पैलकर, सह सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप घुगे, सापळा पथक’ पोलीस हवालदार दिनेश खैरनार, गणेश निंबाळकर, पोलीस नाईक अविनाश पवार,पोलीस शिपाई नितीन नेटारे यांच्या पथकाने केली आहे.

जाहिरात
एकीकडे अजूनही उच्चशिक्षित युवा नोकरीच्या शोधात आहे तर काही युवा अत्यंत तुटपुंज्या पगारावर नोकरी करत आपल्या कुटुंबाचा गाढा हाकत असताना दुसरीकडे प्रत्येक शासकीय विभागातील शिपाई पासून ते अधिकारी पर्यंत प्रत्येकाला किमान ५० हजार रुपयाहून अधिकचा पगार असताना देखील असे उद्योग करायचे बोटावर मोजण्या इतक्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना का सुचतात त्यामुळे अशा लाच घेणाऱ्या अधिकाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करून परत दुसऱ्या कोणाला असं करण्याची हिम्मत झाली नाही पाहिजे याची खबरदारी शासनाने घ्यावी.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे