आपला जिल्हा

तीळवणी वाचनालयात वाचन पंधरवाडा साजरा

तीळवणी वाचनालयात वाचन पंधरवाडा साजरा

 

तीळवणी वाचनालयात वाचन पंधरवाडा साजरा

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २ जानेवारी २०२५कोपरगाव तालुक्यातील तिळवणी येथील सद्गुरू संत गाडगेबाबा महाराज सार्वजनिक वाचनालय यांचे वतीने बुधवार दि १ जानेवारी रोजी ग्रंथालयात वाचन पंधरवाडा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

जाहिरात
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिळवणीचे अशोक राहाणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रम प्रसंगी वाचनाचे महत्त्व तसेच पुस्तकांचे जीवनातील महत्त्व काय असते याविषयी लक्ष्मण पंडोरे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर पुस्तकांची संगत धरावी लागेल जो पुस्तकांच्या संगतीत राहतो तो आयुष्यात यशस्वी होतो असे सांगून वाचनालया चा वापर करून उच्च पदावर गेलेल्या मान्यवरांचा उल्लेख करून विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत गाडगेबाबा आणि डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिळवणी शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत व इशस्तवन सादर केले.

जाहिरात
 वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष  विष्णू वाघ यांनी १ जानेवारी ते १५ जानेवारी पर्यंत जो वाचन पंधरवडा साजरा केला जात आहे त्याविषयी माहिती दिली तसेच या पंधरा दिवसात कोणकोणते कार्यक्रम राबवायचे आहे त्याची माहिती दिली आणि संपूर्ण उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना तसेच विद्यार्थ्यांचे योगदान लक्षात घेऊन बक्षिसांची घोषणाही करण्यात आली निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा कथाकथन स्पर्धा चित्र वाचन स्पर्धा तसेच प्रसंग कथन व संवाद कथन स्पर्धा यामध्ये विशेष यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहन पर बक्षीस जाहीर केले.

समता
 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  लक्ष्मण पंडोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन  तळपे सर यांनी केले . यावेळी विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील पुस्तकाचे प्रदर्शन लावलेले होते त्यापैकी आवडीच्या पुस्तकांचे विद्यार्थ्यांनी वाचन केले तसेच घरी वाचण्यासाठी ही पुस्तके घेतली या कार्यक्रमास अंगणवाडी सेविका आशाताई वाघ , ग्रंथपाल सहाय्यक  अनिल शेळके, वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष विष्णू वाघ,अमोल शिंदे हे उपस्थित होते मुलांना खाऊ वाटप करून या कार्यक्रमाची सांगता झाली.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे