धोत्रे जोहान वॉरियर्सचा ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या वतीने सन्मान
संघाने मिळविले प्रथम नंबरचे बक्षीस

कोपरगाव विजय कापसे दि ११ जुन २०२५–कोपरगाव शहरातील टिळक चौक क्रिकेट क्लब आयोजित टिळक चौक प्रीमियर लीगचा अंतिम सामना व बक्षीस वितरण सोहळा युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या टिळक रोड चॅम्पियन ट्रॉफी चे मानकरी धोत्रे गावातील योगेश बोजगे व जमील शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जोहान वॉरियर्स या संघाने चॅम्पियन ट्रॉफी सन्मानचिन्ह व रोख एक लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक मिळविल्याबद्दल धोत्रे गावचे लोकनियुक्त सरपंच प्रदीप चव्हाण यांच्या संकल्पनेतून संपूर्ण संघाचा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीनं मंगळवारी (दि १०) सन्मान करण्यात आला.


या प्रसंगी ग्रामपंचायत तसेच गावातील विविध संस्थाचे आजी माजी पदाधीकारी सरपंच, उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य तसेच प्रतिष्ठीत नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी गावच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवणाऱ्या न वॉरियर्स संघातील सर्व सदस्यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.






